Health Tips : अनाशापोटी खा ‘ही’ 5 पाने आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि कॅन्सरला पळवा कायमचे

Health Tips :- निसर्गात उगवणाऱ्या अनेक वनस्पती या भारतीय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून एक प्रमुख खजिना असून निसर्गामध्ये उगवणाऱ्या अनेक वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

परंतु आपल्याला बऱ्याच वनस्पतींचे आरोग्य विषयीचे फायदे माहित नसल्यामुळे आपण त्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रचंड प्रमाणात तणाव आणि अनेक गंभीर अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

जगण्यातील धावपळ आणि चुकीच्या आहाराच्या पद्धती यामुळे अनेक आजारांना निमंत्रण देण्याचे काम पार पाडले जात आहे. उत्तम आरोग्यकरिता आयुर्वेदाचा आधार घेणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये प्रसिद्ध आहार तज्ञ लवलीन कौर यांनी काही निसर्गातील एक पाच महत्त्वाच्या हिरव्या पानांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून होणारा फायदा सांगितलेला आहे. त्या विषयीची माहिती या लेखात बघणार आहोत.

आरोग्यासाठी ही पाच हिरवी पाने ठरतील फायद्याचे

निसर्गामध्ये सहज उपलब्ध होणारी पाच ताजी हिरवी पाने खाल्ली तर शरीराची पचन क्रिया आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्याला मदत होते व त्यामुळे अनेक रोग देखील गायब होतात व रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

या सगळ्याबद्दल आहारतज्ञ लवलीन कौर यांनी म्हटले की, हे पाने तुम्ही एकत्र किंवा स्वतंत्रपणे देखील खाऊ शकतात. खाताना मात्र त्यांना तोंडामध्ये चांगले चघळायचे आहेत व नंतरच गिळायचे आहेत. नेमकी ही पाने कोणती व त्यांचा काय फायदा होतो याविषयीची माहिती आपण बघू.

1- कढीपत्त्याची पाने – उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी ताजा कढीपत्ता खावा. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात व ते उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यामध्ये आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करतात.

2- कडुनिंबाची पाने – रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप महत्त्वपूर्ण आहेत. एक्सिमा सारख्या त्वचेच्या आजारांमध्ये कडुलिंबाची पाने अगदी चावून खावेत. कारण कडूलिंबात बायो ऍक्टिव्ह कंपाउंड असतात व ते अँटी इन्फ्लमेंटरी, अँटी फंगल आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्मामुळे ब्लड पुरिफिकेशन म्हणजेच रक्ताचे शुद्धीकरण आणि स्किन डिसऑर्डरमध्ये देखील मदत करतात.

3- ओव्याची पाने – बऱ्याचदा बद्धकोष्ठता व आंबट ढेकर येण्याची समस्या उद्भवते व पचनशक्ती बिघडते. अशावेळी तुम्ही ओव्याची पाने खाल्ली तर तुम्हाला त्यापासून पटकन मुक्तता मिळते. ओव्याच्या पानांमध्ये ऍक्टिव्ह एन्झाइम असतात व ते पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अपचनापासून आराम मिळतो.

4- तुळशीची पाने – दररोज सकाळी उठल्यावर दोन ते तीन तुळशीची पाने खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच तुळशीमध्ये जे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत त्यामुळे शरीरावरील स्ट्रेस म्हणजे ताण तणाव यापासून शरीराला लढण्याची ताकद किंवा क्षमता मिळते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील तुळशीच्या पानांची मदत होते.

5- सदाबहार फुलाची पाने – सध्या कॅन्सर खूप उग्र स्वरूप धारण करत असून खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे जीवघेण्या असलेल्या कॅन्सरचा धोका कमी करण्याकरिता त्याची चेन ब्रेक म्हणजे साखळी तोडणे खूप गरजेचे आहे. सदाबहारमध्ये अल्कलॉइड्स असल्यामुळे ते कॅन्सरविरोधी असल्याचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही जर नियमितपणे सदाबहारचे पानांचे सेवन केले तरी आजारापासून संरक्षण मिळते व तुम्ही कर्करोगापासून स्वतःला दूर ठेवू शकतात.

( या लेखातील माहिती ही सामान्य माहितीसाठी असून आहारामध्ये कुठलाही बदल करताना किंवा अधिकच्या उपचाराकरिता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe