Makhana Benefits : अनेकांना शरीरात कॅल्शिअमची कमतरता भासते. अलीकडील काळात ही समस्या चांगलीच वाढली आहे. अनेकदा कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का की मखाना हा कॅल्शिअमचा खूप उत्तम सोर्स आहे.
दुधात मखाना शिजवून खाल्ला तर सोने पे सुहागा. तुम्ही मखाना हलके भाजून दुधात मिसळून मंद आचेवर शिजवून खाऊ शकता. हे खाल्ल्याने हाडे निरोगी राहतात. आज आपण याठिकाणी जाणून घेऊयात की दुधात मखाना खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात याविषयी –
1. चांगले पचन
पचनाची समस्या असेल तर गरम दुधासोबत मखाना खा. यामुळे पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. खरं तर, दूध आणि मखाना दोन्ही फायबरचे चांगले स्रोत आहेत. हे खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते. दूध आणि मखाना खाल्ल्याने पोटातील हानिकारक पदार्थ बाहेर पडतात.
2. हृदय निरोगी ठेवते
दूध आणि मखाना एकत्र खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. याचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होईल. मखाना मध्ये अल्कलॉइड नावाचे घटक असते, जे हृदयरोग दूर करते. इतकंच नाही तर मखाना मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमदेखील चांगलं असतं.
3. वेट लॉस करण्यासाठी उपयुक्त
जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असाल तर मखाना सेवन करण्यास सुरवात करा. मखान्यात कॅलरीज खूप कमी असतात. आपण आपल्या वेट लॉस डाइट मध्ये दूध मिश्रित मखाना घेऊ शकता.
4. इंस्टेंट एनर्जी बूस्टर
शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दुधात मखाना मिसळून खाल्यास तुमचा थकवा आणि अशक्तपणा दूर होईल. हे एक प्रकारे इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे.