१२ फेब्रुवारी २०२५ मुंबई: आजच्या काळात महिलांच्या आरोग्याबाबत अनेक नवीन आजार उदयास येत आहेत, त्यातील एक म्हणजे एंडोमेट्रिओसिस. हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा एक वेदनादायक रोग आहे. ताज्या अहवालांनुसार, भारतातील प्रत्येक १० पैकी १ महिला या आजाराची शिकार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
एंडोमेट्रिओसिस ही एक स्त्रीरोगविषयक समस्या आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आत आढळणारे एंडोमेट्रियल ऊतक गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागते. हे मुख्यतः अंडाशय, फैलोपियन ट्यूब आणि ओटीपोटाच्या आसपास विकसित होते, ज्यामुळे स्त्रियांना तीव्र वेदना, अनियमित मासिक पाळी आणि प्रजनन समस्यांना सामोरे जावे लागते.
गरोदरपणात समस्या निर्माण होतात का ?
होय ! एंडोमेट्रिओसिसचा थेट परिणाम स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर होतो. हे अंडाशय आणि फैलोपियन ट्यूबवर परिणाम करू शकते, ज्यामुळे अंडी आणि शुक्राणूंची भेट होणे कठीण होते. यामुळेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांमध्ये वंध्यत्व येते.
सशोधन काय म्हणते ?
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतात २५ ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दरवर्षी हजारो महिलांना या आजारामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. डॉक्टरांच्या मते, यावर वेळीच उपचार न केल्यास ओव्हेरियन सिस्ट्स आणि वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो.
लक्षणे काय आहेत ?
एंडोमेट्रिओसिसची लक्षणे स्त्रियांमध्ये भिन्न असू शकतात,परंतु काही सामान्य चिन्हे आहेत : मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना अनियमित मासिक पाळी गर्भधारणेत अडचण पेल्विक भागात वेदना पोटात सूज आणि गॅसची समस्या
इलाज काय ?
• वैद्यकीय थेरपी : हार्मोनल उपचार आणि औषधांनी यावर नियंत्रण ठेवता येते.
• शस्त्रक्रिया : गंभीर प्रकरणांमध्ये, एंडोमेट्रियल टिश्यू काढण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
• जीवनशैलीत बदल योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून या आजाराचे दुष्परिणाम कमी करता येतात.