Sugar Level Control Tips :- धावपळीची जीवनशैली, संतुलित आहारा ऐवजी जंक फूडचे सेवन, जीवन जगण्यातील अनियमितता इत्यादी अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर समस्या शरीरामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहेत.
गेल्या काही वर्षाचा विचार केला तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर हृदयरोग तसेच डायबिटीस सारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढलेले आहे. त्यातल्या त्यात डायबिटीस म्हणजेच मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
डायबिटीज असलेल्या रुग्णांना शरीरातील शुगर लेवल कंट्रोल ठेवणे खूप गरजेचे असते. कारण या आजारावर सध्या तरी नियंत्रण मिळवण्यासाठी तुमची आहार पद्धती आणि व्यायाम इत्यादी गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर आधार आहे.
त्यामुळे रक्तातील शुगर लेवल कंट्रोल ठेवणे हे डायबिटीस रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे असते. या अनुषंगाने आपण या लेखात रात्री झोपताना डायबिटीज असलेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
1- उत्तम आहाराचे नियोजन- जर डायबेटीस झाला असेल तर आहारावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. तुमच्या आहारामध्ये चूक झाली तर त्याचा विपरीत परिणाम हा शुगर लेवल वाढण्यावर होतो. रात्रीच्या वेळी ब्लड शुगर व्यवस्थित ठेवायचे असेल तर आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि हेल्थी फॅटचे मिश्रण असलेला आहार घेणे खूप गरजेचे आहे. तसेच रात्री हलका आहार घ्यावा.
2- झोपण्यापूर्वी चहा घेऊ नये- चहा आणि कॉफी मध्ये कॅफिन नावाचा घटक असतो. त्यामुळे चहा किंवा कॉफीच्या सेवनाने झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण मधुमेही रुग्णांनी कमीत कमी सात ते आठ तासांची व्यवस्थित झोप घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला झोपायचे असेल त्याच्या तीन तास आधी चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये.
3- श्वसनाचे व्यायाम- रात्री झोपण्या अगोदर आराम मिळेल अशा प्रकारचे मेडिटेशन किंवा ब्रिथिंग एक्सरसाइज करावी. असे केल्यामुळे शारीरिक व मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते व झोप देखील चांगली येते. चांगली झोप आल्यामुळे साहजिकच शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत मिळते.
4- शारीरिक हालचाल- ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे अशा डायबिटीस असलेल्या रुग्णांनी शारीरिक हालचाली करणे गरजेचे आहे. त्यामुळे रात्री जेवण झाल्यानंतर हलकासा व्यायाम करावा किंवा थोडेसे चालावे. जर जेवण केल्यानंतर थोडेसे चालले म्हणजेच शतपावली केली तरी शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते.
5- झोपण्यापूर्वी ब्लड शुगर लेवल तपासणे- डायबिटीज असलेल्या रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी ब्लड शुगर लेवल तपासून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देखील शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत मिळते.
( आहारामध्ये कुठलाही बदल करण्याअगोदर व याबाबतीत कुठल्याही प्रकारच्या योग्य सल्याकरिता वैद्यकीय तज्ञांची मदत घ्यावी.)