हृदयविकाराचा झटका हा पूर्वी फक्त वयस्कर माणसांमधील आजार समजला जात होता. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून अगदी तरुण व लहान वयातही हॉर्ट अटॅक आल्याची उदाहरणे समोर आली आहे. आता याच हृदयविकारावर शास्त्रज्ञांनी एक लस शोधून काढलीय. या लसीद्वारे हृदयविकाराचा झटका पुढील आठ वर्षे कमी करता येतो, असा दावा करण्यात आला आहे.
काय आहे दावा?
दक्षिण कोरियातील एका अभ्यासानुसार, काही लोकांना शिंगल्स विरुद्धचे लसीकरण करण्यात आले. त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका २३% कमी झाला. हृदयविकाराचा धोका २२% कमी झाला. हृदय अपयशाचा धोका २६% कमी झाला. महत्त्वाचे म्हणजे या लसीचा संरक्षणात्मक परिणाम आठ वर्षे टिकतो, असा दावा या आभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला. विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षे १२ लाखांहून अधिक लोकांच्या शिंगल्स लसीवर आभ्यास करण्यात आला.

शिंगल्स म्हणजे काय?
शिंगल्स हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामुळे शरीराच्या एका बाजूला पट्टे असलेले वेदनादायक पुरळ उठते. व्हेरिसेला-झोस्टर नावाच्या चिकनपॉक्स विषाणूमुळे हा आजार शरिरात होतो. चिकनपॉक्स झाल्यानंतर अनेक वर्षांनी विषाणू पुन्हा सक्रिय होतो तेव्हा हा आजार होतो. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी शिफारस केलेली शिंगल्स लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवून या पुनरुत्थानाला रोखू शकते.
अभ्यासात काय आढळले?
शिंगल्स विरोधी लस घेतलेल्या लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा धोका २३% कमी झाला. मोठ्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनेचा धोका २६% कमी होता, हृदय अपयश २६% कमी होता, मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम करणारे विकार जसे की स्ट्रोक २४% कमी होता, हृदयविकाराचा झटका २२% कमी होता आणि रक्त गोठण्याचा विकार २२% कमी होता.
लस हृदयविकार रोखते का?
वास्तविक, ही लस शिंगल्सविरुद्ध तयार करण्यात आली होती. शास्त्रज्ञांना वाटली ही लस शिंगल्स रोखते. परंतु या लसीने हृदयविकारावर चांगले कार्य केले. वास्तविक ही लस 50 वर्षांच्या आतील म्हणजेच ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, त्या लोकांमध्ये चांगले कार्य करताना दिसून आली. वास्तविक या दाव्यानंतर या लसीवर अजूनही संशोधन होणार असल्याचे काही बातम्यांमध्ये सांगितले आहे.