अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- केस पांढरे होणे, तसेच फॅशनेबल दिसावे यासाठी अनेकजण केसांना वेगवेगळे कलर देत असतात . आजकाल याची फॅशन देखील वाढली आहे. दरम्यान हेअर डाय लावताना जर तुमच्या त्वचेवर आणि हातावर रंग लागला तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही.
कारण कि, त्वचेवर लागून राहिलेला हेअर कलर सहजपणे निघत नाही. यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही रंग सहज काढू शकता.
टूथपेस्ट वापरा
टूथपेस्ट केवळ दात स्वच्छ करण्याचे काम करत नाही तर हेअर डायचे डागही सहज काढून टाकते. जर तुमच्या त्वचेवर असे डाग पडले असतील तर तुम्ही टूथपेस्टने ते दूर करण्याचा प्रयत्न करू शकता.
पेट्रोलियम जेली
केसांचा रंग वापरताना पेट्रोलियम जेली वापरण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने डाय लावल्यानंतरही चेहऱ्यावर डाग पडला तरी तो सहजपणे काढता येतो. ही पद्धत देखील सोपी आहे आणि त्यामुळे तुमच्या त्वचेवर फारसा परिणाम होणार नाही.
ऑलिव्ह ऑइल
तुम्ही हेअर डाय करताना ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता. जर केसांचा रंग चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लागला असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी ऑलिव्ह ऑईल खूप चांगले आहे.