Health Information: तुमच्या उंचीनुसार किती असावे तुमचे वजन? काय आहे उंची आणि वजनाचा संबंध? वाचा महत्त्वाची माहिती

Ajay Patil
Published:
health update

Health Information:- व्यक्तीची असलेली उंची ही व्यक्तीच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. समाजामध्ये आपण बऱ्याचदा भरपूर उंच तसेच मध्यम उंच व काही बुटके व्यक्ती देखील पाहतो. ज्याप्रमाणे उंची बाह्य व्यक्तिमत्वाकरिता महत्त्वाचे आहे तसेच तुमचे वजन देखिल व्यक्तिमत्वाकरिता खूप महत्त्वाचे आहे.

जर तुमची उंची कमी आणि वजन जास्त असेल तर व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून तर सोडाच परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते हितावह नाही. त्यातल्या त्यात जर वाढत्या वजनाच्या समस्येचा विचार केला तर अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. वजन वाढण्याला व्यस्त असलेली जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी देखील तितक्याच कारणीभूत आहेत.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा बाहेरच खाल्लं जातं व त्यामुळे संतुलन बिघडून वाढत्या वजनाची समस्या उद्भवते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण खूप पद्धतीने प्रयत्न करतात. बऱ्याचदा वजन कमी होते. परंतु कालांतराने दैनंदिन रुटीन मध्ये काहीच बदल झाला तर परत वजन वाढायला लागते. याच दृष्टिकोनातून आपण आपली उंची आणि वजन तसेच वय याचा काय परस्पर संबंध आहे याविषयीचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 किती उंची करिता किती वजन असावे?

1- साधारणपणे एखाद्या व्यक्तीची उंची जर चार फूट दहा इंच असेल तर अशा व्यक्तीचे वजन सामान्यतः 41 ते 52 किलोच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

2- पाच फूट उंचीचा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे वजन 44 ते 55.7 किलोच्या दरम्यान असावे. कारण निरोगी शरीरासाठी वजन आणि उंचीचे समीकरण खूप महत्त्वपूर्ण आहे.

3- व्यक्तीची उंची जर पाच फूट दोन इंच असेल तर अशा व्यक्तीचे वजन 49 ते 63 किलोच्या दरम्यान असावे.

4- पाच फूट चार इंच उंची असलेल्या व्यक्तीचे वजन हे 49 किलो ते 63 किलोच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

5- पाच फूट सहा इंच उंच असलेल्या व्यक्तीचे वजन हे 53 ते 67 किलोच्या दरम्यान असावे.

6- पाच फूट आठ इंच उंची असलेल्या व्यक्तीचे वजन हे 56 ते 71 किलो असावे.

7- पाच फूट दहा इंच उंची असलेल्या व्यक्तीचे वजन हे 59 ते 75 किलोच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

8- सहा फूट उंचीचे व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीचे वजन 63 ते 80 किलोच्या दरम्यान असावे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा विचार केला तर उंचीनुसार वजनाचा समतोल हा एक उत्तम आरोग्याचा निकष आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe