Health Tips : सावधान..! चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका ‘हे’ पदार्थ, वजन आणि साखरेची पातळी राहणार नाही नियंत्रणात

Ahmednagarlive24 office
Published:
Health Tips

Health Tips : धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकते. आपण कधी काय खावे? कधी काय नाही? याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ले तर याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यवर होऊ शकतो. इतकेच नाही तर यामुळे तुमचे वजन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. त्यामुळे जर तुम्हीही असे काही रिकाम्या पोटी पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा.

गोड नाश्ता टाळा

रोज सकाळी गोड नाश्ता करू नका. त्याऐवजी खारट नाश्ता करावा. फिटनेसप्रेमींसाठी हे योग्य आहे. हे प्रथिने आणि चरबीयुक्त नाश्ता दिवसभराची भूक कमी करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर दुसरीकडे, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत असल्याने तुम्हाला लवकर भूक लागते.

आंबट फळे रिकाम्या पोटी घेऊ नका

तसेच आंबट फळे रिकाम्या पोटी खाऊ नका, कारण त्यामुळे पोटात आम्लपित्त होऊ होऊन वारंवार भूक लागते.

मध

अनेकजण आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकदा लिंबू पाण्यात मध मिसळून पित असतात. कारण, त्यामुळे चरबी नियंत्रणात येईल, असे त्यांना वाटत असते. परंतु, असे करणे पूर्णपणे चुकीचे असून मधामध्ये साखरेपेक्षा खूप जास्त कॅलरीज असतात. तसेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. शुद्ध मध मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या तुलनेत ते रक्तातील साखरेची पातळी वाढवून अन्नाची लालसा वाढवू शकते.

चहा

जर तुम्ही रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी घेतला तर खूप हानिकारक असू शकते. कारण ते अॅसिड तयार करत असून ज्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला पोटाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. खरं तर, त्यावेळी तुम्ही सकाळी उठता, त्यावेळी तुमचे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी अगोदरच खूप जास्त असते आणि जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याने ते आणखी वाढू शकते. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर 1-2 तासांनंतरच कॅफिन प्या किंवा आधी काहीतरी खाऊन त्यानंतर प्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe