Health Tips : सावधान! पावसाळ्यात घ्या ‘या’ गोष्टींची काळजी अन्यथा वाढू शकतो मायग्रेनचा त्रास, फॉलो करा सोप्या टिप्स

Published on -

Health Tips : सध्या देशभरात मान्सूनचा पाऊस सुरु आहे. मात्र मान्सून सुरु होताच अनेक आजार डोकं वर काढत असतात. पावसाळ्यात अनेकजण बाहेरचे खाद्यपदार्थ खात असतात. तसेच अनेक चुकीच्या गोष्टींमुळे मायग्रेनचा त्रास वाढत असतो.

चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना शारीरिक समस्या निर्माण होत असतात. सध्या अनेक तरुण तरुणींमध्ये मायग्रेनचा त्रास पाहायला मिळत आहे. तसेच मायग्रेन ही एक सामान्य समस्या बनली आहे.

पावसाळ्यात वातावरणात उच्च दाब तयार होत असतो. त्यामुळे अनेकांमध्ये मायग्रेनची समस्या पाहायला मिळते. तसेच या ऋतूमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात मायग्रेन धोका टाळण्यासाठी फॉलो करा खालील सोप्या टिप्स

1. दिनचर्या पाळा

मायग्रेन हा एक खूप आजर वेदनादायी आहे. जर तुम्हालाही हा आजार टाळायचा असेल तर तुम्हाला तुमची दिनचर्या आहे अशी चालू ठेवणे गरजेचे आहे. तसेच या आजारापासून दूर राहण्यासाठी तुम्ही एक दिनचर्या बनवणे देखील गरजेचे आहे. तुम्ही योग्य वेळी खाणे, पिणे आणि झोपल्यास तुम्ही मायग्रेनचा त्रासापासून दूर राहाल.

2. तणाव घेऊ नका

आजकालचे तरुण आणि तरुणी तणावाचे शिकार बनले आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये मायग्रेनचा त्रास पाहायला मिळतो. तणाव हे एक मायग्रेनचा मुख्य कारण आहे. जर तुम्ही तणावमुख्य राहिला तर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होणार नाही.

3. जास्त विचार करू नका

जर तुम्हालाही मायग्रेनचा त्रास टाळायचा असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार न करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत राहिला तर तुम्हाला देखील मायग्रेनचा त्रास सुरु होईल.

4. थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका

अनेकदा तुम्ही घरी बसून असता आणि आणि अचानक दुपारच्या उन्हामध्ये अचानक बाहेर जाता. त्यामुळे तुमच्या शरीरामधील तापमानात अचानक वाढ होते. त्यामुळे देखील तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तीव्र उन्हामध्ये अचानकपणे जाणे टाळा.

5. पोट रिकामे ठेवू नका

तुम्हीही सतत उपाशी पोटी राहत असाल तर आजपासून ते बंद करा. कारण असे करणे देखील तुम्ही मायग्रेनचा शिकार बनू शकता. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी राहू नये. योग्य वेळी जेवण केल्यास तुम्हाला मायग्रेनचा त्रास होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe