Health Tips : तुम्हालाही असतील ‘या’ वाईट सवयी तर रक्तातील साखरेची पातळी वाढलीच म्हणून समजा, वेळीच सावध व्हा नाहीतर…

Ahmednagarlive24 office
Published:
Health Tips

Health Tips : सध्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. खास करून मागील दशकभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, वाढते वय तसेच कौटुंबिक इतिहासामुळे मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

परंतु जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजाराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतील. तुमच्या छोट्या छोट्या सवयींमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते? हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

दररोज दही खाणे

हे लक्षात घ्या की दही हे प्रोबायोटिक फूड आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर ते खूप फायदेशीर आहे. परंतु आयुर्वेदानुसार, दररोज दह्याचे सेवन नये, कारण जर ते तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचे वजन वाढून चयापचय खराब होऊ शकतो. तसेच तुम्हाला जळजळ होऊ शकते.

जड जेवण

सध्या असे अनेक जण आहेत जे रात्रीचे जेवण खूप उशिरा करत असतात. परंतु याचा तुमच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम दिसून येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार की रात्रीचे जेवण आणि झोपेमध्ये कमीत कमी 2 ते 3 तासांचे अंतर असावे. अशातच जर तुम्ही रात्री जड जेवण केले तर यकृतावरील भार वाढतो. तसेच चयापचय क्रिया खूप हळू होत असल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

जास्त प्रमाणात खाणे

सध्या असे अनेकजण आहेत जे स्वतःच्या ताटात जास्त अन्न ठेवता. ज्यावेळी तुम्ही भुकेपेक्षा जास्त प्रमाणात खातात, त्यावेळी तुम्हाला लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि पचनाशी निगडित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

भूक नसताना खाणे

समजा तुम्ही तुमच्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष न देता जेवण केले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहीजणांना तणावात असताना भूक लागत नाही. अनेकजण भरपूर अन्न खातात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार भूक नसताना जबरदस्तीने खाऊ नये.

अशातच जर तुम्हाला प्री-डायबिटीस किंवा मधुमेहाच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असल्यास या सवयी सुधारणे खूप गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार या सवयींमुळे तुम्हाला इन्सुलिनची संवेदनशीलता, चयापचय आणि पोषणाशी निगडित समस्यांना सामोरे जावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe