Health News : निसर्गाने मानवाच्या आरोग्याची काळजी तंतोतंत घेतलेलीच आहे. अनेक प्रकारच्या फळभाज्या ते फळे-फुले, वेली यांच्या खाण्यापिण्यामुळे मानवी आरोग्य सुलभ होते. याचे कारण म्हणजे यामध्ये विविध प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन यासारखे अनेक समृद्ध स्रोत उपलब्ध असतात.
यांचा मानवी आरोग्याला फायदाच होतो. पण मानवाकडूनच काही चुकीच्या गोष्टींना अतिमहत्त्व दिल्याने कधी कधी जीवालाच धोका निर्माण होतो.बदलत्या जीवनशैलीमुळे मानवांसमोर अनेक जीवघेण्या आजारांनी डोके वर काढले आहे.
याचा परिणाम म्हणजे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण चिंता करायला लावणारे आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टींची शहानिशा न करता केवळ जुजबी आणि अपुऱ्या माहितीवर ‘डायट प्लॅन’ चा ट्रेण्ड एखाद्या व्हायरसप्रमाणे मानवाला मृत्यूच्या जबड्यात खेचत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ती ‘दुधी भोपळ्याची. ‘
दुधी भोपळा खाल्ल्याने आरोग्यविषयक अनेक फायदे ‘ होतात, असे आपण मानतो. पण यामध्येही आपण कोणता दुधी भोपळा खातो यावर बरेचसे अवलंबून आहे. कारण सर्व दुधी भोपळे हे बिनविषारी असतात, असे नाही.
त्यामुळे कळत नकळत विषारी ‘दुधी’ खाल्ला किंवा त्याचा ज्युस घेतला तर निश्चितपणे आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी दुधी भोपळ्याचा रस घेण्यापूर्वी त्याची थोडीशी चव घ्यावी आणि तो जर कडू लागला तर चुकूनही त्याचा ज्युस किंवा भाजी यांच्यासाठी वापर करण्यात येऊ नये.
सर्वसाधारणपणे काही भाज्यांमध्ये नैसर्गिकपणे ‘कुकुरबिटासिन’ नावाच्या पदार्थामुळे कडवेपणा असतो. त्यामुळे अशा भाज्या खाल्ल्यानंतर मानवाच्या रक्तामध्ये साईटोटॉक्सिक’ संयुगामुळे विष तयार होते.
यामुळे लढवय्या पांढऱ्या पेशी नष्ट होत गेल्याने मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे बाजारामध्ये दिसणारे सर्वच दुधी भोपळे हे आरोग्यवर्धक असतात, असे गृहित धरणे चुकीचे आहे.