Dhirubhai Ambani International School Teacher Payment : देशाच्या आर्थिक आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत उभी असलेली धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही शाळा देशातील नामांकित शाळांपैकी एक आहे. या शाळेत विविध सोयी सुविधा आहेत. ही शाळा रिलायन्स इंडस्ट्रीजने बांधली आहे. या शाळेचे नाव इंडस्ट्रीज समूहाचे दिवंगत कुलपिता धीरूभाई अंबानी यांच्या नावावर आहे.
2003 मध्ये ही शाळा सुरू झाली असून तेव्हापासून आजतागायत ही शाळा अविरतपणे सुरू आहे. या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शाहरुख खान, करीना कपूर सह अनेक बॉलीवूड कलाकारांची मुले शिक्षण घेत आहेत. मुकेश अंबानी यांच्या धर्मपत्नी नीता अंबानी या शाळेच्या संस्थापिका आहेत. या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाहरुख खान, करीना कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, शाहिद कपूर, करण जोहर या बॉलीवूड स्टार ची मुले शिक्षण घेत आहेत.
त्यासोबतच क्रिकेटर रोहित शर्मा यांची मुलंही याच शाळेत शिकत आहेत. दरम्यान आज आपण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी किती रुपये खर्च करावा लागतो, या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना किती वेतन मिळतं आणि इथे शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता काय असतात याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विद्यार्थ्यांना किती फी लागते
देशातील नामांकित शाळांमध्ये समाविष्ट झालेल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची फी भरावी लागते. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट नुसार या शाळेत शिक्षण घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला एक ते दीड लाख रुपये एवढा खर्च करावा लागतो. या शाळेमध्ये असणाऱ्या सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे या शाळेची फी ही खूपच अधिक आहे. हे देशातील एक प्रतिष्ठित कॉन्व्हेंट स्कूल आहे.
शिक्षकांना किती वेतन मिळतं
या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दर महिन्याला एक ते दीड लाख रुपये एवढी फी भरावी लागते. यामुळे साहजिकच तुमच्या मनात या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना किती वेतन मिळतं हा प्रश्न उपस्थित झाला असेल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना दोन लाखापासून ते सात लाख रुपयांपर्यंतचे वेतन मिळते. म्हणजेच या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील चांगला जंगी पगार दिला जात आहे.
शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता काय
या शाळेत फक्त बी.एड झालेल्या उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्त केले जाते. एवढेच नाही तर या शाळेत ज्या शिक्षकांकडे किमान पाच वर्षांचा अनुभव आहे अशाच शिक्षकांना नियुक्त केले जाते. अर्थातच जे फ्रेशर आहेत त्यांना या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त केले जात नाही.