Health Tips:- खाण्यापिण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात. यातील काही सवयी या आरोग्यासाठी खूप चांगले असतात तर काही सवयी या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकतात. अगदी तुमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ किंवा दिवसा जेवणाची वेळ याचा देखील परिणाम आरोग्यावर होत असतो.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला गोड पदार्थ खायला आवडतात. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सण उत्सवांची परंपरा असून प्रत्येक सण उत्सवामध्ये प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ मोठ्या प्रमाणावर केले जातात.
याशिवाय बऱ्याच व्यक्तींना रात्री जेवण केल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ खाण्याचे सवय असते. परंतु ही सवय आरोग्यासाठी खरंच चांगली आहे का काही वाईट परिणाम करू शकते? याबद्दल माहिती असणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या संबंधीची माहिती या लेखात घेऊ.
रात्री जेवणानंतर गोड पदार्थ खात असाल तर आरोग्यावर होतील हे परिणाम
1- पचनक्रियेवर होऊ शकतो परिणाम– जर तुम्हाला देखील रात्रीचे जेवण केल्यानंतर काही गोड खायची सवय असेल तर यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. पचनसंस्थेमध्ये जर बिघाड झाला किंवा त्याच्या कार्यात जर बिघड झाला तर अनेक प्रकारचे त्रास सुरू होऊ शकतात.
2- हृदयाच्या आरोग्यासाठी वाईट– जर रात्री जेवण केल्यानंतर काही गोड खात असाल तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले नाही. जर तुम्ही साखर युक्त पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो व त्यामुळे उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढतो.
3- झोपेत बिघाड– रात्री जर गोड खाल्ले तर शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते व मेंदू सक्रिय होतो. यामुळे रात्रीच्या झोपेवरील परिणाम होऊन झोप पुरेशी होत नाही व झोप जर पूर्ण झाली नाही तर अनेक आजार होऊ शकतात.
4- वजन वाढते– समजा तुम्ही रात्री जेवणानंतर गोड पदार्थ खात असाल तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता बळावते. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते व चरबी जमा व्हायला लागते. त्यामुळे वजन जर तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर मिठाई वगैरे असे गोड पदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे.
5- साखरेच्या पातळीत वाढ– रात्रीच्या जेवणानंतर जर गोड पदार्थ खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप कठीण जाते व अचानक साखरेची पातळी वाढते किंवा ताबडतोब घसरायला लागते. असे झाल्यामुळे ताणतणाव वाढतो. डोके दुखायला लागते व हे आरोग्यासाठी घातक आहे.