चपाती करताना ‘या’ चुका कराल तर होतील कॅन्सरसारखे आजार , जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Health News

Health News : चपाती हा आपल्या जेवणातला एक कॉमन पदार्थ. चपाती शिवाय जेवण अपूर्णच. परंतु ही दररोजच्या जेवणात लागणारी चपाती जे योग्य पद्धतीने बनवली नाही तर अनेक आजारांना तुम्हाला बळी पडावे लागू शकते.

पीठ मळण्यापासून ते तव्यावर भाजण्यापर्यंत अनेक चुका होऊ शकतात की ज्याने आरोग्य बिघडू शकते. चला आपण याठिकाणी त्याविशषयी जाणून घेऊयात –

* चपात्यांना ऍल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळण्याची चुकी करू नका

लोक भाजलेल्या चपात्या ऍल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळतात की जी अत्यंत घातक सवय आहे. त्याऐवजी तुम्ही ती कापडात गुंडाळू शकता.

* नॉन-स्टिक पॅनचा वापर

आपण चपाती कशावर कशापद्धतीने भाजत आहात हे देखील महत्वाचे आहे. चपाती हेल्दी बनवायची असेल तर नॉन स्टिक पॅनवर नव्हे तर लोखंडी कढईवर भाजून घ्या.

* पीठ मळल्यानांतर काही काळ थांबा

ताजे पीठ मळल्यानंतर ते कमीतकमी 5 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ बाजूला ठेवा. म्हणजे ते चांगले फर्मेंट होईल. त्यामुळे त्यात आरोग्यास चांगले बॅक्टेरिया वाढतील.

* एकाच प्रकारच्या पिठाच्या चपात्या खा

आहारतज्ञ सांगतात की, आपण मल्टीग्रेन म्हणजेच अनेक ध्यान्यापासून बनवलेल्या पिठापासून बनलेली चपाती खाऊ नये. एकाच पिठापासून बनवलेल्या चपात्या खा मग त्या ज्वारी, नाचणी वा गव्हाच्या पिठाच्या असोत.

* पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा

पीठ चटकन आणि मऊ होण्यासाठी गव्हाचे पीठ एका भांड्यात घ्या. चवीनुसार मीठही घालू शकता. मीठ घालून थोडे कोमट पाण्यात मिसळावे. आता हाताने पीठ चांगले मळून घ्या. पीठ मळताना त्यात पाणी घालून हळूहळू मिक्स करावे. जेणेकरून पाण्याचा अंदाज येतो, पिठात जास्त पाणी मिसळत नाही. त्यानंतर पीठ हात ओले करून चांगले दाबून घ्यावे. अशा वेळी पीठ सहज मळले जाते आणि चपातीही मऊ बनतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe