डायबेटीसपासून मुक्ती हवी तर गोड न खाण्याबरोबरच ‘या’ गोष्टींवरही ठेवा लक्ष, आयुष्यभर निरोगी राहाल

डायबेटीस हा आजार अगदी सामान्य झाल्यासारखा झालाय. आज घरोघरी शुगरचे पेशंट दिसतील. ज्यांना डायबेटिस झाला आहे ते लोक जास्त पथ्य पाळतात. परंतु बऱ्याचदा असे दिसून आले आहे की, लोक डायबेटिसचा संबंध थेट गोड खाण्याशी जोडतात. म्हणजे डायबेटीस झाला की गोड खाणे बंद करावे, म्हणजे हा त्रास कमी होईल. हे खरे असले तरी पूर्णसत्य नाही.

गोड पदार्थांचे अतिसेवन हेच केवळ मधुमेहाचे कारण नाही. तुमच्या काही सवयी देखील याला कारणीभूत असतात, त्यामुळे त्यावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती –

व्यायाम :-मधुमेहापासून दूर राहण्यासाठी, दररोज किमान 30-40 मिनिटे फिजिकल एक्टिविटीज केल्या पाहिजेत. जॉगिंगपासून सायकलिंग, योगा, बॅडमिंटन, फुटबॉल इ. खेळण्यापर्यंत कोणत्याही हालचाली तुम्ही करू शकता. जेणे करून तुमचा घाम निघेल व तुम्ही फिट राहाल. योगा करणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. हार्मोन्स संतुलित ठेवणारी, पचनसंस्था निरोगी ठेवणारी अनेक आसने आहेत, ज्यामुळे मधुमेहाचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

खाण्यापिण्याच्या सवयी बदला :- तुम्ही निरोगी आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. एकाच वेळी भरपेट खाण्यापेक्षा दिवसातून तीन ते चार वेळा कमी कमी प्रमाणात खाणे उचित ठरेल. विशेषत: फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून येतात. तळलेले पदार्थ, जंक फूड खाऊ नका.

वजन :- प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्तीचे वजन कमी झाले तर तो मधुमेहापासून बऱ्याच अंशी दूर राहू शकतो. हाच नियम मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना लागू होतो. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 18 ते 23 दरम्यान ठेवा.

पांढरे पदार्थ टाळा :- बऱ्याचदा पांढरे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. हे पांढरे पदार्थ म्हणजे मीठ, साखर, मैदा. या गोष्टी शक्यतो टाळलेल्या कधीही चांगल्या. याने डायबेटीस नियंत्रणात राहतो.

अल्कोहोलिक पदार्थ :- सिगारेट आणि मद्याच्या सेवनामुळे रक्तदाब, लठ्ठपणा, शुगर अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासूनही दूर राहा.

अशा पद्धतीने जर विविध गोष्टी आपण पाळल्या तर नकीच डायबेटीस पासून आपण दूर राहू. आपण आपले आरोग्य जपणे हीच सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe