तोंडाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर, हिरड्यांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको !

Updated on -

तुम्हाला तुमच्या तोंडाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर हिरड्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, दात दुखणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तोंडाच्या आरोग्याशिवाय आपले एकंदर आरोग्य अपूर्ण आहे.

कारण जर हिरड्यांमध्ये अस्वस्थता किंवा सूज असेल तर तुम्ही दैनंदिन जीवनातील सामान्य कामे नीट पार पाडू शकणार नाही आणि खाण्या-पिण्यातही प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. या समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हिरड्या खराब होण्याची लक्षणे अगोदर ओळखणे आणि उपचारासाठी डेंटिस्टकडे जाणे.

हिरड्यांचे दुखणे कसे ओळखाल
तोंड स्वच्छ करूनही हिरड्यांमधून दुर्गंधी येत असेल तर त्यासाठी, तुम्ही तुमच्या तोंड स्वच्छ करण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत, ज्यामध्ये तुमची जीभ घासणे आणि माऊथवॉश वापरणे उचित राहील. हायड्रेटेड राहा आणि श्वासाची दुर्गंधी आणणारे अन्नपदार्थ टाळा.

हिरड्यांमध्ये संवेदनशीलता आणि वेदना
अनेक वेळा हिरड्यांना स्पर्श केल्याने किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकल्याने वेदना होतात किंवा ते अतिसंवेदनशील होतात. अशा परिस्थितीत खूप गरम आणि खूप थंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. संवेदनशीलता टाळण्यासाठी, डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट वापरा. तसेच कडक टूथब्रश टाळा.

हिरड्यांमधून रक्त येणे
काहीवेळा हिरड्यांमधून सहजपणे रक्तस्त्राव सुरू होतो, विशेषतः ब्रश करताना किंवा फ्लॉस करताना. यासाठी सॉफ्ट ब्रशिंग आणि फ्लॉसिंगच्या पद्धतींचा वापर करावा. तोंडाच्या संपूर्ण स्वच्छता आणि तपासणीसाठी आपल्या डेंटिस्टला भेट द्या. जळजळ आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी अँटीमाइक्रोबियल माऊथवॉश वापरा.

हिरडी दातांमधून पू येणे
जेव्हा दात आणि हिरड्यांमध्ये पू किंवा स्त्राव तयार होतो तेव्हा खूप वेदनादायक वाटते. हा प्र्रकार संसर्गामुळे होतो ज्यावर वेळेत उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कडुलिंबाचे दातुन देखील वापरू शकता कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे.

हिरड्या सुजणे
तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल की हिरड्या सुजल्यासारखे वाटू लागतात. हे टाळण्यासाठी, दररोज दोनदा ब्रश करून, नियमितपणे फ्लॉसिंग करून तोंडाचे आरोग्य चांगले ठेवा. सूज कमी करण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.दातांच्या उपचारांसाठी आपल्या डेंटिस्टला भेट द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe