आरोग्याबाबतच्या अनेक तक्रारी होतील दूर, फक्त आयुर्वेदातील 6 नियम रोज पाळून बघा!

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. अशात आयुर्वेदात सांगितलेले 6 जेवणाचे नियम जर व्यक्तीने पाळले तर पचनशक्ती वाढतेच शिवाय आरोग्य टिकते आणि शरीरात ऊर्जा देखील कायम राहते.

Published on -

Eating Rules | जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल, तर जेवताना काही नियम पाळायलाच हवेत. आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात याचे स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. आजकाल बहुतेक लोक वेगाने, तणावात किंवा चुकीच्या वेळेला जेवतात आणि यामुळे पचनसंस्था बिघडते, थकवा वाढतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

या लेखात आपण आयुर्वेदात सांगितलेले अन्न खाण्याचे 6 नियम जाणून घेणार आहोत,जे पाळले तर शक्ती, ऊर्जा आणि आरोग्य कायम टिकते.

1. 7पहिला नियम

भूक लागल्यावर अति जेवण टाळा. संपूर्ण पोट न भरता थोडी जागा अन्न मिक्स होण्यासाठी आणि पचनासाठी सोडावी. यामुळे पोटावर अनावश्यक ताण येत नाही.

2. दूसरा नियम

आपल्या शरीराची पचनशक्ती दुपारी सर्वात तीव्र असते. त्यामुळे पौष्टिक आणि भरपेट जेवण दुपारी करावे. कारण, सूर्यप्रकाशानुसार आपले शरीर कार्य करते.

3. तिसरा नियम

रात्री पचनक्रिया मंदावते. अशात उशिरा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो सूर्यास्तानंतर 2 तासात जेवून घ्या.

4. चौथा नियम

शिळं किंवा फ्रिजमधून काढून गॅसवर गरम केलेलं अन्न हे पोषणमूल्य गमावलेलं असतं. दिवसभरात तयार झालेलं अन्न रात्री खाल्लं तरी चालेल, पण पुन्हा गरम करू नका.

5. पाचवा नियम

जेवण नीट न पचल्याची लक्षणं जसे की ढेकर, पोट फुगणं दिसल्यास लगेच पुन्हा जेवू नका. त्याऐवजी उपवास करा आणि कोमट आले पाणी प्या. यामुळे पचन सुधारेल.

6. सहावा नियम

अर्धवट शिजवलेले किंवा थंड अन्न पचायला अवघड असते. जेवण गरम आणि पूर्ण शिजलेले असले पाहिजे. यामुळे ते सहज पचते आणि शरीराला पोषण मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News