Mumbai News : साथीच्या आजारांनी मुंबईकर हैराण!

Ahmednagarlive24 office
Published:
Mumbai News

Mumbai News : मुंबईत साथीचे आजार वाढू लागले असून, यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो या आजारांचे आठवड्याभरात २०० ते ३०० रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

गेल्या महिन्यात जलजन्य आजारात वाढ झाली होती; परंतु या महिन्यात जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी कीटकनाशक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

२३ जुलै रोजी मलेरियाच्या ४९५ रुग्णांची नोंद झाली होती. १२३ ते ३० जुलै या आठवडाभरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत २२६ ने वाढ झाली असून, मलेरियाचे ७२१ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ डेंग्यूचे ५७९, गॅस्ट्रो १६४९, लेप्टो ३७७ रुग्णांची नोंद झाली आहे. साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

१ ते ३० जुलैपर्यंत रुग्णांचे निदान
मलेरिया – ७२१
लेप्टो- ३७७
डेंग्यू – ५७९
गॅस्ट्रो – १,६४९
कावीळ – १३८
स्वाईन फ्लू – ८६ चिकनगुनिया – २४

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe