Pregnancy Tips : कोणतीही चाचणी न करता समजेल तुम्ही प्रेग्नन्ट आहात की नाही? जाणून घ्या गर्भधारणेची लक्षणे

Ahmednagarlive24 office
Published:
Pregnancy Tips

Pregnancy Tips : आजकाल बाजारात गर्भधारणा तपासण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची यंत्रणा आली आहे. तसेच घरबसल्या काही किट्सद्वारे देखील महिला काही मिनिटांमध्ये गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासू शकतात. मात्र कोणत्याही चाचणीशिवाय देखील गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजू शकते.

गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी अनेक महिला चाचणी किटचा वापर करत असतात. मात्र पूर्वीच्या काळात चाचणी किट नव्हती तरीही महिलांना गर्भधारणा झाली आहे हे समजत असायचे.

त्यामुळे जर तुम्हालाही चाचणी न करता जाणून गर्भधारणा झाली आहे की नाही हे जाणून घेईचे असेल तर तुम्ही घरबसल्या काही लक्षणांद्वारे ते जाणून घेऊ शकता. तसेच तुम्हाला कसल्याही प्रकारची चाचणी करण्याची गरज नाही.

गर्भधारणा झालेली हे फक्त चाचणी केल्यावरच कळते असे नाही. चाचणी न करता देखील गर्भधारणा झाली आहे हे समजून येते. महिला त्यांच्या ५ लक्षणांनी त्या गर्भवती आहेत की नाही हे जाणून घुले शकतात.

स्त्रियां गरोदर राहिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ५ दिवसांनी काही बदल दिसून येतात. शुक्राणूंद्वारे अंडी फलित झाल्यानंतर 5-6 दिवसांनी ही लक्षणे दिसून येत असतात. तर काही महिलांना पाच किंवा सहा आठवड्यांनंतर लक्षणे दिसून येत असतात. चला तर जाणून घेऊया गर्भधारणेची लक्षणे…

1. मासिकपाळी थांबते.

2. मळमळ आणि उलट्या समस्या निर्माण होतात.

3. जास्त वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा तयार होते.

4. मूड स्विंग आणि चिडचिड करण्याची लक्षणे जाणवतात.

5. नेहमीपेक्षा जास्त भूक लागते.

6. दिवसभर जास्त थकवा जाणवतो.

7. स्तनाचा आकार आणि कोमलता बदलणे.

8. शरीरात वेदना नुआरमान निर्माण होतात.

डॉक्टर काय शिफारस करतात

डॉक्टर अनेकदा महिलाना गरोदर आहे की नाही हे तपासण्यासाठी चाचणी करण्यास सांगत असतात. काही महिलांमध्ये असे काही आजार आहेत ज्यामुळे महिलांना अशी लक्षणे देखील दिसून येऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडून नेहमी चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe