स्तन पुनर्रचनेसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया ! निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमीची टीलूप प्रक्रिया ; क्लिष्ट प्रक्रियेतून महिलांची सुटका होणार

Published on -

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर स्तनाची पुनर्रचना करण्यासाठी क्लिष्ट प्रक्रिया वापरली जात होती,पण आता त्या प्रक्रियेतुन महिलांची सुटका होणार आहे कारण अपोलो कॅन्सर सेंटर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निप्पल स्पेअरिंग मॅसेक्टॉमीची पुनर्रचना ही टीलूपचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

भारतात कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्तन पुनर्बाधणी करण्यासाठी ऑटोलॉगस टिश्यू तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.यामध्ये शरीराच्या खुप ठिकाणी व्रण राहत होते.या गोष्टीवर अभ्यास करून स्तनाच्या कर्करोगावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करता येतात.परंतु,अपोलो कॅन्सर सेंटरने या समस्येतून मार्ग काढला आहे.

आधुनिक पुनर्बांधणी पर्यायांसह एकत्रित रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमीत जास्त (व्रण) चिरा न करता सुरक्षित पुनः प्राप्ती होते.आरएनएसएम प्रक्रियेत स्तनाची त्वचा,आकारमान यात कमीत कमी बदल होईल याची काळजी घेतली जाणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातली पहिली शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी ब्रेस्ट सर्जन डॉ. संदीप बिप्टे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण केली असून ४३ वर्षीय ज्योती या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात टीलूप रिकन्स्ट्रक्शनच्या मदतीने केलेली रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग प्रक्रिया ही फक्त तांत्रिक उपचार प्रक्रिया नसून यामुळे कर्करुग्णांना मनोबल आणि चांगली उपचार पद्धत मिळाली असल्यामुळे स्तनाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी उत्तम पर्याय मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News