मुले सांभाळा ! बालकांची सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे दवाखान्यात गर्दी, ‘अशी’ घ्या काळजी

Health News : जिल्ह्यातील बालरुग्णालये असो किंवा खासगी इतर ओपीडी असो येथे सर्वत्र बालरुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लहान मुले सध्या हवामानात मोठा बदल जाणवत आहे. सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे आजारी पडत असून जवळपास ८० टक्के बालरुग्णांत सारखीच लक्षणे आढळून येत आहेत.

सध्या वातावरण विषम आहे. कधी थंडी तर कधी आभाळ येत असल्याने, या बदलत्या हवामानामुळे आजारी पडण्याचे प्रमाण जसे वाढले आहे. सामान्यपणे असणाऱ्या रुग्णामध्ये तब्बल १५ ते २० टक्क्यांनी आजारी लहान मुलांची भर पडली आहे. बालरोगतज्ज्ञांनी पालकांनी वेळीच उपचार घेतले तर बालकांचे आरोग्य चांगले राहिल असे म्हटले आहे.

थंडीचाही परिणाम

हवामानात सध्या मोठा बदल झाला असून ढगाळ हवामानामुळे हवेतील गारवा वाढलेला आहे. या हप्त्यामध्ये सरासरी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहिले आहे.

थंडी वाढल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लहान बालकांत संसर्गजन्य आजार जसे की, सर्दी, खोकला, ताप आदी आजार वाढले आहेत. डेंग्युचे रुग्ण आता कमी झाले आहेत.

अशी घ्या आपला मुलांची काळजी

वातावरण बदलत असल्याने, विषम असल्याने बाहेरचे पदार्थ मुलांना देणे टाळायला हवे. घरात लहान मुले असतील तर मोठ्यांनी शिंकताना, खोकताना नाकासमोर रुमाल ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क वापरणे देखील आवश्यक आहे.

मुलं आजारी असेल तर शाळेत पाठवू नयेत. मुलांच्या डोक्यात कानटोपी व अंगात स्वेटर ठेवा. आपल्या बाल्याला वाऱ्यात फिरण्यापासून, पाण्यात खेळण्यापासून दूर ठेवले पाहिजे. तेलकट, आंबट, थंड पदार्थ मुलांना सध्या या दिवसात देऊ नये. घरात सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींनी शक्यतो इतरांपासून दूरच राहावे.