अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- कानांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास दातदुखी, मार लागणे, अलर्जी होणे, एखाद्या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करणे अशा कारणांमुळेही कानाची समस्या होऊ शकते.
मायग्रेन, खूप गोंगाटात जास्त वेळ राहणे वा काही आनुवांशिक कारणांमुळे ही कानांची तक्रार होऊ शकते. कानात झालेले छोटेसे इन्फेक्शन बेपर्वाईमुळे मोठा त्रास उभा करू शकते. कानांची देखभाल कशी करावी ते पाहू या.
कानाचे तंत्र : मुख्यत्वे कानाचे तीन भाग असतात. ज्यापैकी बाहेरच्या भागात कॅनॉल म्हणतात. मधल्या भागात पडद्यामागे तीन छोटी हाडे असतात. ज्यामध्ये मेलियस, इंकस, स्टेपिससह यृस्टेशियन ट्यूब असते. सर्वांत आतील भागाला लेबिरिन्थ म्हणतात. ज्यामध्ये कॅनॉल व अत्यंत सूक्ष्म ट्यूब असतात.
कानांचे रोग व प्रकार : –
कानदुखी : – हा सर्वसामान्य त्रास बहुधा मुलांमध्ये आढळतो. जेव्हा कानाच्या मध्यभागात एखाद्या इन्फेक्शनमुळे सूज येते तेव्हा वेदना होऊ लागतात. कानातील एखाद्या पुरळ-फोडामुळेही वेदना होतात.
कान बाहणे : – कानातील वॅक्स धूळ, बॅक्टेरिया व मळ कानात जाण्यापासून रोखतो, पण मार लागल्यास वा इन्फेक्शन झाल्यास जेव्हा कानाचा पडदा क्षतिग्रस्त होतो तेव्हा रक्त वा इतर द्रव पदार्थ स्रवू लागतो. ज्याला ओटोरिया वा कान वाहणे म्हणतात.
परेस्बीक्युसीस : – ही समस्या मुख्यत्वे ६५ वा त्यावरील वयाच्या लोकांमध्ये आढळते. ज्यामध्ये बय वाढण्यासोबत श्रवणक्षमता हळू हळू कमी होऊ लागते.
ओटाइटिस मीडिया : – कानाच्या मध्यभागात सूज आल्यास पडद्यामागे द्रवपदार्थ तयार होऊ लागतो. जो हळूहळू श्रवणक्षमता संपवतो. ही समस्या वाढल्यानंतर श्रवणक्षमता गंभीर रूपात प्रभावित होऊ लागते. याला ग्लू इयर वा सिक्रेटी ओटाइटिस मीडिया म्हणतात.
कानाच्या पडद्याला छिद्र : – कानाच्या बाह्य व मध्य भाग दरम्यान टिम्पेनिक नावाची एक अत्यंत पातळ जाळी असते. जी ध्वनिलहरी कानात शिरताच हलते. यामुळेच आपण ऐकू शकतो. मार लागल्यास वा इन्फेक्शन झाल्यास ही जाळी फाटली तर त्याला कानाला छिद्र पडणे म्हणतात. असे झाल्यास माणसाला कमी वा पूर्णपणे ऐकू येणे बंद होऊ शकते.
कान बंद होणे : – मळ साठल्यास वा कानात पाणी भरल्यास असे होऊ शकते. याशिवाय कानाच्या आत असलेल्या सूक्ष्म नळ्यांमध्ये आग वा सूजेमुळे ही असे होते.
स्विमर्स इयर : – पोहताना पाणी कानात गेल्यामुळे असे होते. यामुळे कानात वेदना व खाज होऊ लागते. याला स्विमर्स इयर म्हणतात. कडक उन्हामुळे बा उकाड्यामुळेही कानाला सूज येऊ शकते. मोठ्यांमध्ये जास्त इयरवॅक्समुळेही असे होऊ शकते.
इयर बायोट्रामा : – पाण्यात खूप खोल गेल्यास वा पर्वतावर खुप उंचावर गेल्यास कानांच्या पडद्यांवर तीव्र दाब पडतो. विमानप्रवासात ही काहींना कानात वेदनेसह शीळ वाजल्याचा आवाज येण्याची तक्रार होऊ लागते. हे हवेच्या दाबामुळे होत असते.
ऑटोमायकोसिस : – पावसाळ्यात आर्द्रतेमुळे कानात फंगल इन्फेक्शन चा धोका वाढतो. यामुळे कान वाहण्यासोबत तीव्र वेदना व खाज होऊ शकते. सतत कूलर समोर बसल्यास ही समस्या गंभीर होत जाते.
सायनस संक्रमण : – दीर्घकाळपर्यंत सायनसच्या समस्येने कानात हवेचा दाब वाढतो. कानात जडपणा वाढतो. उपचार न करवून घेतल्यास कानात तीव्र वेदना होऊ लागतात.
कानाचा कॅन्सर : – हा एक दुर्लभ रोग आहे. जो कानाच्या बाह्यत्वचेत वा आतील भागात एक ट्यूमरच्या रूपात कोठे ही होऊ शकतो. कॅन्सरच्या या पेशींना स्क्वैमस सेल कार्सीनोमाच्या नावानेही ओळखले जाते. ज्या न ओळखल्या गेल्यास हळूहळू संपूर्ण शरीरात पसरू शकतात.
टिनीटस : – ही सामान्य समस्या आहे
होणारा बहिरेपणा, जादा इयर वॅक्स, कानाला दुखापत वा सर्क्युलेटरी शेगामुळे लोकांना सतत कानात गोंगाट जाणवत असतो. कित्येकदा आवाज एवढा तीव्र असतो की माणूस व्यवस्थित ऐकू शकत नाही.
काहींना असे नेहमी जाणवते. टिन्ञीटसमुळे माणसात चिडखोरपणा, झोप न येणे व एकाग्रतेचा अभाव ही राहू लागतो.
औषधांनी हा पूर्णपणे बरा करता येऊ शकत नाही. यासाठी गोंगाट व तणावाचे व्यवस्थापन करावे लागते. कानाच्या रोगात काही प्राथमिक लक्षणे एकसमान असतात.
उदा. कानदुखी, कान भरल्यासारखा वाटणे, शीळेचा आवाज ऐकू येणे, कान वाहणे, कानाच्या आजूबाजूला सूज, कानात खाजेसोबत त्वचा लाल होणे, कानाची त्वचा उतरणे, जीव घाबरणे,
चक्कर व ताप येणे, ऐकू कमी येणे, डोकेदुखी व डोळे स्थिर न राहणे इ. काही गंभीर केसेसमध्ये कानातून द्रवपदार्थ व रक्त वाहण्यासोबत दुर्गधी ही येऊ लागते. कान वाहणे, कानदुखीसारख्या समस्या लहान मुलांना जास्त होतात.
काही मुलांच्या कानांत जन्मजात समस्या असते जी वेळीच उपचार न केल्यास वाढते. छोट्या मुलांच्या कानांची अंतर्गत रचना अत्यंत छोटी व मुलायम असते.
मार लागल्यास वा मुलांना झोपून स्तनपान करवल्यास त्यात इन्फेक्शनची भीती वाढते. कानांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास दातदुखी, मार लागणे, अँलजीं होणे, एखाद्या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करणे अशा कारणांमुळेही कानाची समस्या होऊ शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम