अशा प्रकारे करा मुलांमधील लठ्ठपणाला प्रतिबंध !

Sushant Kulkarni
Published:

३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : लहान वयात लठ्ठपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः कोविड महामारीनंतर ही मोठी आरोग्य संबंधित समस्या ठरली आहे. लॉकडाऊन्स दरम्यान दीर्घकाळापर्यंत शारीरिक व्यायामाचा अभाव आणि स्क्रीनवर व्यतित केल्या जाणाऱ्या अधिक वेळेमुळे मुलांमध्ये अनारोग्यकारक वजन वाढण्याचा धोका वाढला आहे.पालक व केअरगिव्हर्सनी या समस्येचे गांभीर्य समजून घेणे आणि मुलांना आरोग्यदायी सवयी लावणे मुलांच्या एकूण आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे,असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.

लठ्ठपणामुळे शरीरात फॅटचे प्रमाण वाढते,ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.मुलांचे वजन जास्त आहे किंवा ते लठ्ठ आहेत,याचे मूल्यांकन करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हे सोपे व गुणकारी साधन आहे.बीएमआय वजन (किग्रॅ) आणि उंची (चौरस मीटर) यांचे गुणोत्तर घेऊन गणन केले जाते आणि सरासरीच्या माध्यमातून मुलांमधील बीएमआय ठरवला जातो.

वय व लिंगसाठी ९५ टक्क्यांवरील बीएमआय म्हणजे लठ्ठपणा, तर ८५ ते ९५ टक्क्यांदरम्यान बीएमआय म्हणजे वजन जास्त आहे.पालक त्यांच्या मुलांच्या जीवन शैलीला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन हॉस्पिटलचे कन्सल्टण्ट पेडिएट्रिक एण्डोक्रिनॉलिस्ट डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.

मुलांनी दररोज किमान ६० मिनिटे पुरेशा प्रमाणात शारीरिक व्यायाम केला पाहिजे. सायकल चालवणे, नृत्य किंवा टीम स्पोर्ट्स खेळणे यांसारख्या अॅक्टिव्हिटीज मधून फिटनेस वाढण्यासोबत सामाजिक कौशल्ये आणि मानसिक आरोग्य देखील सुधारेल. आयएपी (इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्स) स्क्रीनवर व्यतित केला जाणारा वेळ २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिदिन १ तासापेक्षा कमी आणि ५ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी प्रतिदिन २ तासांपेक्षा कमी असण्याची शिफारस करते.स्क्रीनवर अधिक वेळ व्यतीत केल्याने बसून राहण्याची सवय लागते आणि आहार सवयींवर देखील परिणाम होतो.

कुटुंबासोबत एकत्र आहार सेवन केल्याने संतुलित आहार, योग्य प्रमाण आणि उत्तम आहार निवडीला प्राधान्य मिळते. जेवताना टीव्ही किवा फोन असे व्यत्यय टाळा. झोपमोडीमुळे भूकेचे नियमन करणाऱ्या हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतो,ज्यामुळे अतिप्रमाणात आहार सेवन केले जाऊ शकते.

मुलांना त्यांच्या वयानुसार दररात्री ९ ते १२ तास झोप मिळण्याची खात्री घ्या.पालकांनी पौष्टिक आहाराचे सेवन व सक्रिय राहणे अशा आरोग्यदायी सवयींचा अवलंब केला पाहिजे, ज्यामुळे मुलांना देखील त्याच सवयी अंगिकारण्यास प्रेरणा मिळेल.मुलांमधील लठ्ठपणाला प्रतिबंध करणे सर्वांची जबाबदारी आहे.

वयाच्या सुरुवातीच्या काळात आरोग्यदायी सवयी अंगिकारण्यास प्रेरित करीत पालक त्यांची मुले आरोग्यदायी प्रौढ व्यक्ती बनण्याची खात्री घेऊ शकतात. नियमित पेडिएट्रिक तपासणी, बीएमआयवर देखरेख आणि त्वरित समस्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग मुलांना संतुलित, सक्रिय जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबींसह साह्य करीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ या, असेही त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe