Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. महिनाभरात तब्बल २ हजार रुग्ण वाढले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर शहरासह जिल्हाभरात स्वच्छतेची काळजी न घेता
उघड्यावर विक्रीस असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे तसेच दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे डायरिया व डिसेंट्रीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
ग्रामीण भागात २५ गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. दूषित पाणी पिल्यामुळेयामुळे जलजन्य आजाराचा धोका वाढला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हाभरातील रुग्ण व उद्भवलेल्या आजारांची नोंद घेतली जाते. महिनाभरात डायरिया चे १७५० तर डिसेंट्रीचे ६७८ रुग्ण आढळून आले.
वर्षभरात जुलाबाचे तब्बल ३३ हजार १८ रुग्णाची नोंद आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली. त्यामुळे सर्वानीच खाण्यापिण्याविषयी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
दूषित पाणी आढळलेली गावे
पिंपळदरी, चैतन्यपुर (अकोले ) पाटेवाडी (जामखेड), पठारवाडी (कर्जत) मोर्वीस (कोपरगाव) दशमीगव्हाण, भोरवाडी (नगर), देवी भोयरे, ढवळपुरी, तिखोल (पारनेर) सोमठाणे खुर्द, पाथर्डी,
मोहोज खुर्द (पाथर्डी) चांदेगाव ‘दवणगाव, ताहराबाद (राहुरी) चिकणी, हिवरगाव पठार, खांबे, कुंभारवाडी, चंदनापुरी (संगमनेर ) जोहरपुर (शेवगाव) चिखली, वेळू, चिलेखनवाडी (श्रीगोंदे)
तालुकानिहाय डायरिया व कंसात डिसेंट्री रुग्णांची संख्या
नगर २०६ (५२), अकोले २५ (१७९), जामखेड ५८ (०) कर्जत ६० (२५) कोपरगाव ६ (१८), नेवासे ४९ (३८), पारनेर ९९ (२७), पाथर्डी ९८ (३५) शेवगाव १२० (१८), राहता १४५ (९०) राहुरी ११२ (१०१), संगमनेर १०१ (६१) श्रीगोंदे २७६ (७) श्रीरामपूर ७७ (२७)