९ जानेवारी २०२५ मुंबई : हिवाळ्यात नाक लाल होणे सामान्य आहे.ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, जी थंड आणि आर्द्रतेमुळे होते.हिवाळा ऋतू येताच आपण अनेक शारीरिक बदल अनुभवतो. या सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे नाक लाल होणे. हिवाळ्यामध्ये बहुतेकांना ही समस्या जाणवते परंतु असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?
वास्तविक, नाक लाल होणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.जेव्हा बाहेरचे तापमान कमी होते, तेव्हा शरीराच्या पेशी आणि रक्तवाहिन्या थंड वातावरणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रतिसाद देतात. या प्रक्रियेत नाकातील रक्तवाहिन्या पसरतात, त्यामुळे नाकाचा रंग लाल किंवा गुलाबी होतो.
ही कारणेही कारणीभूत
अॅलर्जी आणि सर्दी-खोकला : हिवाळ्यात अॅलर्जीचा त्रासही वाढतो.जेव्हा आपल्याला अॅलर्जी किंवा सर्दीचा त्रास होतो तेव्हा नाक फुगते, ज्यामुळे नाक लाल होते.याशिवाय जास्त शिंका येणे किंवा नाक चोळल्यानेही हा त्रास वाढू शकतो.
नाकातून रक्त येणे : हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असल्याने नाकातील श्लेष्मल त्वचा कोरडी पडू लागते, त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.अशा स्थितीत नाकाचा रंग लाल होऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय
- हिवाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नाकात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे.
- नाकाच्या आत कोरडे होऊ नये म्हणून खोबरेल तेल किंवा व्हॅसलीनचा वापर करा.
- थंडीत नाक साफ करताना आणि शिंकताना टिश्यूचा वापर करा.
- याच्या मदतीने नाकातील संसर्ग आणि सूज कमी होऊ शकते.
- घरात जास्त हीटर्स वापरल्याने हवा कोरडी होऊ शकते.
- त्यामुळे नाकात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते त्यामुळे हीटरचा वापर कमी करा किंवा ह्युमिडिफायरचा वापर करा.