सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. सर्व व्यवहार हे ऑनलाईन होताना दिसतात. सध्या अनेक लोक पेटीएम किंवा फोन पे सारखे अँप वापरतात. पूर्वी लोक आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी दुकानात जात. परंतु आता या ऑनलाईन अँप द्वारेच रिचार्ज केले जाते. तुम्हीही बऱयाचदा पेटीएमद्वारे रिचार्ज केले असेलच.
त्यामुळे तुमच्या ल्सखात आले आले की पेटीएम मागील काही काळापासून फोन रिचार्ज करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून 1 रुपये आकारत आहे. ही रक्कम नगण्य असल्याने आपणही जास्त लक्ष कधी देत नाही. परंतु एक एक रुपया करता कंपनी मात्र लाखोंचा नफा कमावते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, पेटीएम 1 रुपये का आकारत आहे? त्यामागे मोठं कारण आहे. चला जाणून घेऊयात –
कंपनी अजूनही प्रॉफिटमध्ये नाही :-ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे. परंतु तेव्हापासून आजपर्यंत ही कंपनी ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेवर काम करत आहे. कंपनीला अद्याप नफा झालेला नाही. याशिवाय पेटीएम एकाच वेळी अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवत आहे. पेटीएम यूपीआय, पेटीएम पेमेंट्स बँक, पेटीएम मॉल आदी ठिकाणी कंपनी आपला व्यवसाय वाढवत आहे. मात्र, अद्याप कंपनीचा प्रॉफिट गेन झालेला नाही. त्यामुळे कंपनी लोकांना शानदार सेवा पुरवण्यासाठी या मार्गाने पैसे जमवत आहे.
कंपनीचे नेमके काय आहे प्लॅनिंग ? :- कंपनीचे असे म्हणणे आहे की आम्हाला आमचे रिझर्व्ह वाढवायचे आहेत. ज्याद्वारे आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकू. या प्लॅनिंगमुळेच प्रोसेसिंग फी म्हणून कंपनी 1 रुपये शुल्क आकारत आहे. कंपनी विविध मार्गाने व्यवसाय वाढवत आहे. त्यामुळे कंपनी अल्पवधीतच प्रॉफेटमध्ये येऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनी प्रॉफेटमध्ये आली की, कंपनी हे शुल्क देखील काढून टाकणार असल्याची माहिती मिळाली आहे.