Ajab Gajab News : ह्या कर्करोगावर कर्करोगावर दारू ठरणार रामबाण उपाय ?

Published on -

Ajab Gajab News : दारू ही अनेक रोगांचे कारण ठरते, असे जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ गेली अनेक वर्षे सांगत आले आहेत. दारू पिण्याचे अनेक धोके आजवर समोरही आले आहेत. पण एका नव्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, स्वादुपिंडाच्या कर्करोगावर मद्यपान हा प्रभावी इलाज ठरू शकतो.

हाँगकाँगमधील बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यानुसार मद्यामध्ये असलेले लिकोरिस हे संयुग स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी लढा देण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

संशोधकांनी लिकोरिसमधील संयुगाचा उंदरांवर प्रयोग करून पाहिला असता असे आढळून आले की, ट्युमरवर ३० मिलीग्रॅम आयएसएल संयुग वापरल्याने ट्युमरचा आकार कमी झाला.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ चायनीज मेडिसिनचे प्राध्यापक जोशुआ को का शून म्हणाले की, ‘केमोथेरपी उपचारांमध्ये पुढील विकासासाठी हे कंपाऊंड विचारात घेण्यासारखे आहे. आयएसएलमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाची वाढ रोखण्याची क्षमता आहे.

ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जिथे शरीराच्या पेशी खराब झालेले किंवा अनावश्यक घटक साफ करतात. को का शून आता स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी युरोप आणि चीनमधील वैद्यकीय क्षेत्रातून सहकार्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe