Health Tips: नखांवरून ओळखता येते शरीरातील काही आजाराची चिन्हे; नखांमध्ये होणाऱ्या बदलांकडे नका करू दुर्लक्ष,वाचा माहिती

Ajay Patil
Published:
nails

Health Tips:- शरीरामध्ये जेव्हा काहीतरी एखादी छोटी किंवा मोठी समस्या उद्भवते तेव्हा त्या समस्येची किंवा शरीरात असलेल्या एखाद्या आजाराची लक्षणे आपल्याला शरीराच्या बाह्य भागांवर दिसून येतात. तसेच काही लक्षणे देखील आपल्याला दिसायला लागतात. फक्त आपल्याला संबंधित लक्षणे ओळखता येणे गरजेचे असते.

अशी आजाराचे किंवा इतर समस्यांची लक्षणे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर आपल्याला जाणवतात. यामध्ये हातांवर असेल किंवा पायांवर असेल व याशिवाय इतर छोटे मोठे भागांवर देखील अशी लक्षणे जाणवू शकतात. जर आपण हाताच्या बोटांची नखे पाहिली तर त्यामध्ये होणारे बदल हे देखील आपल्याला गंभीर आजार असल्याचे सूचित करत असतात.

शरीरात कुठल्या पोषक घटकांची कमतरता आहे हे देखील आपल्याला नखांमध्ये होणाऱ्या बदलामुळे समजू शकते. त्या अनुषंगाने आपण या लेखात याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत.

नखांमधील बदलावरून ओळखा काही आजारांची लक्षणे

1- वारंवार नखे तुटणे समजा तुमचे नखे जर वारंवार तुटत असतील किंवा खूप कमकुवत होत असतील तर ते तुमच्या शरीरामध्ये महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे दाखवत असते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर शरीरामध्ये जीवनसत्वे तसेच प्रोटीन्स, आवश्यक खनिजे यासारख्या पोषक तत्वांची कमतरता आहे व त्यामुळेच नखे कमकुवत झाली आहेत असे समजावे.

2- नखे निस्तेज दिसणे बऱ्याचदा ज्या पद्धतीने सामान्य परिस्थितीत नखे दिसतात त्यापेक्षा एखाद्या वेळेस नखे निस्तेज  दिसायला लागतात. अशावेळी तुम्ही जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. नखांचा रंग बदलणे किंवा तो खराब होणे म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा किंवा कुपोषण व लिव्हरची समस्या आहे असा त्याचा अर्थ होतो.

3- नखांवर पांढरे डाग असणे बऱ्याचदा नखांवर आपल्याला पांढरे डाग दिसून येतात. परंतु याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का जेव्हा शरीरामध्ये विटामिन बी, प्रोटीन आणि झिंकची कमतरता असते तेव्हा नखांवर पांढरे डाग येतात. त्यामुळे वेळीच ही लक्षणे ओळखून आहारात बदल करणे गरजेचे आहे.

4- नखाच्या रंगांमध्ये बदल होणे नखांच्या रंगांमध्ये बदल होणे हे देखील काही आजारांचे लक्षण आहे. जर तुमच्या नखांवर निळे किंवा काळे डाग दिसत असेल तर ते शरीरामध्ये रक्ताभिसरणाची कमतरता दर्शवते. याचाच अर्थ शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही व हे हृदयाशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe