Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध हा शिक्षण, व्यवसाय, वाणी, हुशारी आणि बुद्धिमत्ता इत्यादींचा कारक मानला जातो. कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत असल्यामुळे लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळते. पण जर बुध कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय व्यवसायातही नुकसान होते.
अशातच बुध 19 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. हा काळ काही राशींसाठी खूप शुभ मानला जात आहेत. तर काहींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहणार नाही. या काळात तुमचा खर्च वाढेल. आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. अभ्यासात अधिक लक्ष द्यावे लागेल. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
वृश्चिक
सिंह राशीतील बुधाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही. कार्यक्षेत्रात समस्या उद्भवू शकतात. तुमच्या जॉब प्रोफाइलमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, योग्य नियोजन आणि मेहनतीने व्यवसायात नफा कमावता येईल. पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक विचार करा.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात, सर्दी आणि तापाचा त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना विशेष काळजी घ्या, सतर्क राहा. भाग













