हनुमानजयंतीला ‘या’ 3 चुका चुकूनही करू नका, बजरंगबली होतील नाराज!

हनुमान जयंती हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. यावर्षी हा शुभदिन 12 एप्रिल 2025 रोजी येतोय. देशभरातील मंदिरांमध्ये भक्त मोठ्या भक्तिभावाने हनुमानजींची पूजा-अर्चा करतात, हनुमान जयंतीच्या दिवशी भक्तांनी विशेष करून 3 गोष्टी टाळाव्यात, अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते.

Published on -

Hanuman Jayanti 2025 |हनुमान जयंती हा दिवस भक्तांसाठी खूप उत्साहाचा दिवस असतो. याच दिवशी चैत्र पौर्णिमेला बजरंगबलीचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. यावर्षी हा शुभदिन 12 एप्रिल रोजी येतोय. देशभरातील मंदिरांमध्ये भक्त मोठ्या भक्तिभावाने हनुमानजींची पूजा-अर्चा करतात, हनुमान चालीसा पठण, प्रसाद वितरण, आणि भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. पण या दिवशी भक्तांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण काही गोष्टी बजरंगबलींना आवडत नाहीत. अशा चुका टाळल्या नाहीत तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

मूर्तीला स्पर्श टाळा-

पहिली गोष्ट म्हणजे मूर्तीला स्पर्श न करणे , विशेषतः महिलांनी. हनुमानजी ब्रह्मचारी असल्याने महिलांनी त्यांची मूर्ती, फोटो किंवा मुखवटा यांना स्पर्श करू नये. यामुळे पूजा अपूर्ण मानली जाते.

चरणामृताने स्नान-

दुसरी मोठी चूक म्हणजे चरणामृताने स्नान घालणे . अनेक लोक अनावधानाने हनुमान मूर्तीला चरणामृत, म्हणजेच पंचामृताने स्नान घालतात. पण हे चुकीचे आहे. हनुमान पूजेसाठी फक्त पाणी, दूध, गुलाबजल किंवा अत्तर वापरणे योग्य आहे. चरणामृत हे केवळ प्रसाद म्हणून वापरणे योग्य ठरते.

रंग

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्यांचा रंग . हनुमान पूजेसाठी काळा किंवा पांढरा रंग निषिद्ध मानला जातो. विशेषतः हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे अत्यंत शुभ मानले जाते. लाल रंग हनुमानजींचा आवडता रंग आहे, त्यामुळे तो त्यांच्या कृपेची प्राप्ती करतो.

या तिन्ही गोष्टी टाळून भक्त जर हनुमान पूजन करतात, तर त्यांचे कार्य सिद्ध होते, संकटं टळतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी भक्तिभावासोबत नियमांचेही पालन करणे महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News