Hanuman Jayanti 2025 | हनुमान जयंती 2025 मध्ये 12 एप्रिल रोजी साजरी होणार असून ही रात्र भक्तांसाठी अत्यंत प्रभावशाली मानली जाते. या शुभ संधीवर केलेले उपाय नशीब बदलू शकतात. डोक्यावर कर्जाचा डोंगर, इच्छा अपूर्ण राहणं, किंवा बिघडलेली कामं… हनुमानजींच्या कृपेने सगळं शक्य आहे. हनुमान जयंतीच्या रात्री धार्मिक उपाय केल्यास ग्रहदोष, आर्थिक संकट, मानसिक अशांतता यावर प्रभावी उपाय मिळू शकतो.
ग्रह शांततेसाठी उपाय
हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करून चंद्रदेवाची पूजा करावी आणि त्यांना अर्घ्य अर्पण करावा. त्यानंतर “ॐ नमो भगवते चंद्राय” या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे ग्रहदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहता आणि घरातही सकारात्मक ऊर्जा येते.

इच्छापूर्तीसाठी उपाय
जर तुमच्या मनातील एखादी खास इच्छा सतत अपूर्ण राहत असेल, तर या रात्री हनुमान चालीसा 7 वेळा पठण करा. त्यानंतर हनुमानजींना गूळ आणि चणे अर्पण करा. पूजा संपल्यानंतर मनातील इच्छा 3 ते 5 वेळा स्पष्टपणे उच्चार करा. श्रद्धेने केलेला हा उपाय तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतो.
कर्जमुक्तीसाठी उपाय
जर कर्जातून सुटका हवी असेल, तर हनुमान जयंतीच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करा. समोर तुपाचा दिवा लावून “श्री लक्ष्मी सूक्त” पठण करा. हे उपाय करताना घरात शांत आणि पवित्र वातावरण ठेवा. श्रद्धेने आणि भक्तीने केलेल्या या उपासनेमुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि कर्जातून मुक्ती मिळते.
हनुमान जयंतीच्या रात्री साधलेली उपासना मनोबल वाढवते, ग्रहांची अशुभता कमी करते आणि बजरंगबलींचा आशीर्वाद लाभतो. हनुमानजी संकटमोचन आहेत, त्यामुळे त्यांच्या कृपेने आयुष्यातील अडथळे सहज दूर होतात.