Mangal Rashi Parivartan : सूर्याला ग्रहांचा राजा तर, मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. नऊ ग्रहांमध्ये हे दोन्ही ग्रह ताकदवान समजले जातात. जेव्हा या दोन्ही ग्रहांच्या घरांमध्ये बदल होतो, तेव्हा सगळ्या राशींवर त्याचा कमी- अधिक प्रमाणात परिणाम होतो. मंगळाला सैन्य, युद्ध, शौर्य आणि उत्साहाचा कारक मानले जाते. मंगळाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा अनेक राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. आता येत्या 7 जूनला मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह ही सूर्याची रास असल्याने सेनापती राजाच्या घरी जाणार आहे. त्याचा पाच राशींवर खूप शुभ परिणाम दिसणार आहे.
1. सिंह राशी
मंगळ ग्रह सिंह राशीत भ्रमण करणार आहे. सिंह ही सूर्याची रास समजली जाते. त्यामुळे मंगळाचे हा बदल सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगला समजला जात आहे. या लोकांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. आरोग्य सुधारेल. विवाहोच्छुकांचे विवाह जुळतील. विवाहित लोकांच्या आयुष्यातही आनंद येईल.

2. कन्या राशी
या राशीसाठीही मंगळाचे हे भ्रमण शुभ राहील. मंगळाच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील. एखादा नवा प्रोजेक्टही सुरु होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
3. तूळ राशी
या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे भ्रमण सकारात्मक ठरेल. मंगळ या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या आकराव्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे यावेळी या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असेल.
4. वृश्चिक राशी
या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे भ्रमण शुभ राहील. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना फायदा होईल. त्यांना संयम आणि शांततेने काम करावे लागेल. समाजात तुम्हाला आदर मिळेल. सरकारी कामात नियमांचे पालन केल्यास फायदा होईल. या राशीच्या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील.
5. मीन राशी
मंगळाचे भ्रमण या राशीच्या लोकांसाठी चांगले राहणार आहे. मीन राशीच्या लोकांना शत्रूंवर सहज विजय मिळवता येईल. सोने आणि तांब्याचा व्यवसाय करणाऱ्यांना भरघोस नफा मिळू शकतो. आरोग्य चांगले राहील. जुने आजार दूर होतील. या लोकांचा समाजात आदर वाढेल. प्रत्येक कामात हे लोक यशस्वी होतील.