आचार्य चाणक्य यांनी आयुष्याचे सार अगदी सोप्या शब्दांत सांगितले आहे. आचार्य चाणक्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि योगी पुरुष मानले गेले होते. त्यांनी संसारीक जिवनातील बारीक-सारीक गोष्टींचे व चढ-उतारांच्या कारणांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. चाणक्यांना सांगितलेली नैतीक मुल्ये काळाच्या ओघात मागे पडली असली तरी ती सध्याच्या जिवनात प्रत्येकासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांना गरिबी येण्याची कारणेही सांगितली आहेत.
नेहमी वाईट बोलणारे
जे लोक अत्यंत वाईट बोलतात किंवा इतरांशी संभाषण करताना कठोर शब्दांचा वापर करतात, त्यांच्याकडे लक्ष्मी म्हणजेच पैसा थांबत नाही. लक्ष्मी ही चंचल असते. जे लोक इतरांना अनादर करतात किंवा त्यांना घालून-पाडून बोलतात त्यांच्या घरात ती थांबत नाही. लक्ष्मीची कृपा राहावी असं वाटत असेल, तर सर्वांशी गोड बोलले पाहिजे.

अति खादाड लोक
ज्या लोकांना भुक नसेल तरी जेवायची सवय असते, त्या लोकांकडेही लक्ष्मी थांबत नाही. प्रमाणाबाहेर खाण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्याकडे कधीच पैसा टिकत नाही. आपल्या खाण्या-पिण्यावर जो नियंत्रण ठेवतो, त्याच्या घरी लक्ष्मी वास करते, असं आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अति खाणं टाळावं व श्रीमंत व्हाव, असा सोप्पा उपाय त्यांनी सांगितला आहे.
अस्वच्छ राहणारे
जे लोक अस्वस्च्छ असतात किंवा ज्यांना घाणीत राहीलं तरी काहीच वाटत नाही, त्यांच्या घरी लक्ष्मी थांबत नाही. जेथे स्वच्छता व टापटीपपणा असतो, तेथे लक्ष्मी वास करत असते. तुमचे कपडे घाणेरडे असेल, तुम्ही आंघोळ करत नसाल, तर तुमच्याकडे लक्ष्मी कधीच येणार नाही. अशा लोकांकडे पैसे कधीच टिकत नाहीत.
अवेळी झोपणारे
रात्री लवकर झोपून सकाळी सूर्योदयापुर्वी उठणाऱ्या लोकांकडे लक्ष्मी थांबते. जे लोक वेळेत झोपतात आणि वेळेत पहाटे उठतात त्यांच्याकडे लक्ष्मीचा वास असतो. ज्या लोकांची दिनचर्या शास्त्राला धरुन आहे, त्यांच्याकडे लक्ष्मी राहते. अन्यथा जे लोक वेळी- अवेळी झोपतात त्यांच्यावर लक्ष्मी नाराज होते. मग ते लखपती असले तरी लवकर कंगाल होतात.