अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट जन्मतारखांवर जन्मलेल्या मुलांमध्ये प्रशासनिक सेवांमध्ये (IAS/IPS) यश मिळवण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांची विचारसरणी, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. ज्योतिषी आणि वास्तु तज्ञ डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्या मते, मूलांकांचा प्रभाव व्यक्तीच्या यशावर मोठा परिणाम करतो. चला जाणून घेऊया कोणत्या मूलांकाच्या लोकांसाठी IAS आणि IPS होणे सोपे ठरते.
मूलांक 1
ज्या लोकांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. हा अंक सूर्याशी संबंधित असून तो ऊर्जा, धैर्य आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. मूलांक 1 असलेल्या लोकांमध्ये तीव्र बुद्धिमत्ता, नेतृत्व कौशल्य आणि संघर्ष करण्याची क्षमता असते.
मूलांक 1 असलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
हे लोक स्वाभिमानी आणि अत्यंत आत्मविश्वासाने भरलेले असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण असते. जे लोकांना प्रभावित करते.ते कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नेहमी तयार असतात.उत्कृष्ट नेतृत्वगुण असल्यामुळे ते सहज कोणत्याही गटाचे नेतृत्व करू शकतात.
त्यांना कोणाच्याही अधीन राहून काम करणे आवडत नाही; ते स्वतः निर्णय घेणारे असतात.शिक्षणात अत्यंत रस असतो.विशेषतः प्रशासकीय अभ्यासक्रमांमध्ये त्यांची रुची असते.कठीण परिस्थितीतही हे लोक घाबरत नाहीत आणि अडचणींवर मात करण्यासाठी धैर्याने पुढे जातात.
IAS/IPS होण्यासाठी 1 मूलांकाची मदत
मूलांक 1 असलेल्या लोकांची बुद्धी तीक्ष्ण असते आणि त्यांची निर्णयक्षमता उत्तम असते. प्रशासकीय सेवांसाठी सर्वांत महत्त्वाचे असलेले आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि धाडस या लोकांमध्ये भरपूर असते. सूर्याच्या प्रभावामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्वितीय तेज आणि जबाबदारी पार पाडण्याची ताकद असते. त्यामुळेच IAS आणि IPS सारख्या मोठ्या पदांसाठी ते अधिक योग्य ठरतात.
यशासाठी मूलांक 1 कसा प्रभावी ठरू शकतो?
जर तुमचा मूलांक 1 असेल आणि तुम्हाला प्रशासकीय सेवांमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्या नैसर्गिक कौशल्यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने जाऊ शकता. कठोर परिश्रम, ध्येयावर केंद्रित राहणे आणि सतत शिकण्याची तयारी ठेवली तर तुम्हाला यश निश्चित मिळते.