Numerology:- ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहताऱ्यांची स्थिती आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर पडणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो तर अंकशास्त्रामध्ये व्यक्तीची जन्मतारीख आणि त्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक यानुसार त्याचा स्वभाव तसेच त्याचे आयुष्य कशा पद्धतीचे राहील हे सांगितले जाते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर सहा मुलांक म्हणजेच ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा, 15 आणि 24 तारखेला झालेला असतो त्यांचा मुलांक हा सहा असतो. अंकशास्त्रामध्ये सहा या अंकाचा स्वामी ग्रह शुक्र मानला गेलेला आहे व त्याचा प्रभाव हा वरील जन्म तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या जीवनावर दिसून येतो. या अनुषंगाने जर या तारखांना जन्मलेल्या मुलीशी लग्न झाले तर त्या मुली पतीसाठी खूप भाग्यवान असल्याचे अंकशास्त्र सांगते. चला तर मग या लेखात आपण सहा मुलांक असलेल्या मुलींशी लग्न एखाद्या व्यक्तीला कसे फायद्याचे ठरू शकते? याची थोडक्यात माहिती बघू.
सहा मुलांक असलेल्या मुली पतीसाठी असतात भाग्यवान?
आपण पाहिले की कोणत्याही महिन्याच्या सहा, पंधरा किंवा 24 तारखेला ज्या मुलींचा जन्म झालेला असतो त्यांचा मुलांक सहा असतो. अशा मुली या पतीसाठी अतिशय शुभ मानल्या जातात. त्या नवऱ्यावर प्रेम तर करतातच परंतु त्याच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याला खंबीरपणे साथ देतात. या मुलींना पतीच्या गरजा काय आहेत व त्याच्या भावना अगदी नीटपणे समजतात. सहा मुलांक असलेल्या मुली जेव्हा तिच्या पतीच्या कोणत्याही कामांमध्ये त्याला खंबीरपणे साथ देते तेव्हा पतीचे काम हे यशस्वी होते व यशाचा मोठा टप्पा देखील गाठते. म्हणूनच सहा मुलांक असलेल्या मुलींना पतीच्या आयुष्यामध्ये सुख आणि ऐश्वर्या देणारे असल्याचे मानले जाते.

सहा मुलांक असलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो?
अंकशास्त्रानुसार बघितले तर सहा मुलांक असलेल्या मुली या स्वभावाने खूपच शांत असतात तसेच सुंदर आणि मनमिळाऊ देखील असतात. या मुली कुटुंब आणि नातेसंबंध यांचे महत्त्व काय आहे हे चांगले समजून घेऊन त्या पद्धतीने वर्तन करतात व आपल्या प्रियजनांची खूप काळजी घेत असतात. म्हणून अतिशय उत्तम गृहिणी म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. या मुली पतीच्या आयुष्यामध्ये सुख तसेच आनंद आणण्याची क्षमता ठेवतात व पतीसाठी अतिशय शुभ व भाग्यवान असतात.