Numerology : ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात खूप बुद्धिमान; तुमचा जन्मही या दिवशी असतो का?

Updated on -

Numerology : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते त्याचप्रमाणे अंकशास्त्रात जन्मतारखेच्या मदतीने व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की, भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी.

अंकशास्त्राद्वारे एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मदत घेतली जाते. व्यक्तीच्या जन्मतारखांची बेरीज करून एक संख्या मिळवली जाते, त्याला मूलांक संख्या असे म्हणतात,

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या 8 असेल. ही संख्या जन्मतारखेची बेरीज करून काढली जाते. दरम्यान, आज आपण मूलांक संख्या 4 असलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.

मूलांक 4

महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेले लोकांचा मूळ क्रमांक 4 असतो. या मूलांकाच्या लोकांचा अधिपती ग्रह राहू आहे. अशा लोकांना धाडसी जीवन जगणे आवडते. चला या व्यक्तींबद्दल आणखी खास गोष्टी जाणून घेऊया.

-मूलांक क्रमांक 4 असलेले लोक खूप निश्चिंत असतात आणि त्यांना कोणतीही चिंता न करता आयुष्य जगायला आवडते. तसेच हे लोक कोणालाही आपले दुःख दाखवत नाहीत, आणि अगदी हसत सर्व समस्यांवर मात करतात.

-या लोकांचा स्वभाव खूप शांत आणि स्थिर असतो. या स्वभावामुळे हे व्यक्ती जीवनात हवे ते मिळवतात.

-हे लोक त्यांच्या घराची आणि समाजाची संपूर्ण माहिती स्वतःकडे ठेवतात. कुठे आणि केव्हा काय घडत आहे आणि परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे त्यांना चांगले माहीत असते.

-जर आपण या लोकांच्या नातेसंबंधांबद्दल बोललो तर त्यांचे मुख्यतः मूलांक क्रमांक 4 च्या असलेल्या लोकांशीच बनते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe