Numerology Secrets : तुमचा ज्योतिषशास्त्रात विश्वास आहे का मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना फार महत्त्व असते. अंकशास्त्र असं सांगतो की व्यक्तीच्या फक्त जन्मतारखेवरून त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमान काळ कसे आहे याची कल्पना येते.
अंकशास्त्रात मुळांक भाग्यांक नामांक अशा अंकांना अधिक महत्त्व दाखवण्यात आले आहे. यातील मुळांक म्हणजे आपल्या जन्मतारखेचा अंक असतो. मुळांक हा जन्म तारखे वरून निघतो. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला झालेला असेल तर त्याचा मूळ अंक दोन राहणार आहे.

त्याचवेळी कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक सुद्धा १+१= दोन राहणार आहे. दरम्यान आज आपण अशा मुलांका बाबत माहिती पाहणार आहोत ज्या मुलांकाचे लोक अचानक श्रीमंत होण्याची क्षमता ठेवतात.
कधी कधी काही लोकांच्या आयुष्यात पैशांचा आणि यशाचा ओघ इतका वाढतो की पाहणारे थक्क होतात. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभतं आणि संपत्ती जणू त्यांच्या मागे धावत येते. हे नेमकं का घडतं, याचं उत्तर अंकज्योतिषशास्त्रात दडलेलं आहे.
अंकज्योतिषानुसार प्रत्येक अंकामागे एक ऊर्जा, ग्रह आणि वेगळं व्यक्तिमत्त्व असतं. त्याच ऊर्जांचा परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर, करिअरवर आणि नशिबावर होतो. विशेष म्हणजे, ज्यांचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, ते लोक राहू ग्रहाच्या प्रभावाखाली येतात.
राहू म्हणजे गूढता, रहस्य आणि अनपेक्षित यशाचं प्रतीक. अशा लोकांचं व्यक्तिमत्त्व मेहनती, शिस्तप्रिय आणि ध्येयवादी असतं. त्यांच्यात एक अद्भुत गूढपणा असतो, जो त्यांना गर्दीत वेगळं ठरवतो. हे लोक धोका पत्करण्याला घाबरत नाहीत, उलट जोखमीच्या निर्णयांमधूनच ते यश मिळवतात.
त्यांची बुद्धी, विचारांची खोली आणि वेगळं पाहण्याची दृष्टी त्यांना इतरांपेक्षा पुढे नेते. अंकशास्त्र सांगतं की, या लोकांना मीडिया, राजकारण, संशोधन आणि कायदा अशा क्षेत्रांमध्ये विशेष यश मिळतं. त्यांची निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास लोकांना प्रभावित करतो.
अनेकदा त्यांच्या कल्पना सुरुवातीला विचित्र वाटतात, पण काळाच्या ओघात त्याच कल्पना क्रांती घडवतात. मनाने धार्मिक आणि प्रामाणिक असलेले हे लोक नियमबद्धतेवर विश्वास ठेवतात. ते स्पष्टवक्ते असतात आणि मदतीला तत्पर राहतात. त्यांचा आत्मविश्वास आणि मेहनतच अखेरीस त्यांना अचानक श्रीमंती आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवते.
थोडक्यात, जर तुमचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला असेल, तर राहूचा प्रभाव तुमच्या नशिबाला नवीन दिशा देणार आहे. योग्य दिशा, प्रयत्न आणि आत्मविश्वास कायम ठेवलात, तर एक दिवस तुमचं नशीबही उजळून निघणं निश्चित आहे.













