अडकलेली कामं होतील पूर्ण! गजकेसरी योगाचा ‘या’ राशींना होणार जबरदस्त लाभ 

गजकेसरी राजयोगामुळे 10 ते 13 एप्रिलदरम्यान मेष, सिंह आणि मकर राशींना विशेष लाभ होणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक सुधारणा होऊन नोकरीच्या नव्या संधी मिळतील. 

Published on -

Gajakesari Rajyog |  भारतीय ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग एक अत्यंत प्रभावशाली आणि शुभ मानला जातो. हा योग जेव्हा चंद्र आणि देवगुरू गुरु एकाच वेळी एकमेकांवर प्रभाव टाकतात तेव्हा तयार होतो. 10 एप्रिल 2025 रोजी अशाच प्रकारचा योग पुन्हा एकदा साकारत असून, तो 13 एप्रिल पर्यंत प्रभावी राहील. या काळात मेष, सिंह आणि मकर राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

या कालखंडात गुरु आणि चंद्राची युती धन, प्रतिष्ठा, पदोन्नती आणि वैवाहिक सुखासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. चला जाणून घेऊया या शुभ योगाचा कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे.

मेष (Aries) 

मेष राशीसाठी हा काळ अनेक संधी घेऊन येईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल आणि व्यवसायात लाभ होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल. जोडीदारासोबत चांगले संबंध तयार होतील. नव्या ओळखी प्रस्थापित होतील.

सिंह (Leo) 

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केल्यास फायदा होईल. कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेपासून फायदा होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक शांतताही लाभेल.

मकर (Capricorn) 

या राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगामुळे नशिबाची उत्तम साथ मिळेल. जुनी अडचणीत अडकलेली कामे मार्गी लागतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. अध्यात्म आणि धार्मिक यात्रांकडे ओढा वाढेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास वाढेल.

गजकेसरी योगाची वैशिष्ट्ये-

गजकेसरी योग तयार होतो जेव्हा चंद्र आणि गुरु एकत्र येतात किंवा एकमेकांवर दृष्ट टाकतात. जर हे संयोग जातकाच्या कुंडलीत 1ल्या, 4थ्या, 7व्या किंवा 10व्या स्थानावर होत असतील तर हा योग अधिक बलवत्तर मानला जातो. या योगामुळे व्यक्तीला जीवनात प्रसिद्धी, संपत्ती, आणि यश मिळण्याची शक्यता प्रबळ होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe