अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख ही विशेष फळ देणारी असते. अंकशास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव व त्याची प्रगतीही समजते. अंकशास्त्र केवळ व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींबद्दलच सांगत नाही, तर भविष्याबद्दल अचूक अंदाजही लावते. त्यामुळेच अंकशास्त्र खूप लोकप्रिय झाले आहे. ही विद्या जन्मतारीख, जन्मवर्ष किंवा नाव या अक्षरांवरून काढलेले आकडे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याबद्दल सांगण्यासाठी विश्वासार्ह मानते.
मुलांक म्हणजे काय?
जन्मतारखेचा अंक आणि त्याची बेरीज यावरून मिळणाऱ्या एका अंकाला अंकशास्त्रात ‘मूलांक’ म्हणतात. मुलांकावरुन जन्माचे अनेक रहस्ये उलगडतात. मुलांकात सहा नंबरला खूप लकी समजले जाते. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या जन्मतारेखाला जन्मलेल्या व्यक्ती या सहा मुलांकांच्या असतात. या मुलांकाला राजकुमार समजले जाते.

कसे असे 6 मुलांकाचे लोक?
अंकशास्त्रात शुक्राला मूलांक 6 चा स्वामी समजले जाते. हा ग्रह सुख, वैभव, प्रेम, विलासी जीवन, सुख, धन, वैभव आणि ऐश्वर्य देतो. शुक्राला या सर्वांचा कारक मानले जातो. शुक्रामुळे लक्झरी वस्तू मूलांक 6 असलेल्या लोकांना अधिक आकर्षित करतात. या मूलांकाचे लोकं भरपूर सुख आणि लक्झरी वस्तूंना आकर्षित करतात. ही लोकं अनेकदा खूप फॅशनेबल असतात. महागड्या गाड्या, कपडे, दागिने आदींचा त्यांना छंद आहे.
सर्व गोष्टीत असतात निपुण
अंकज्योतिषानुसार कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मुलांक 6 मानला जातो. हि लोकं सहसा खूप आकर्षक व्यक्तिमत्त्व असतात आणि इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्यात निपुण असतात. अश्याने आकर्षणाने लोकं त्यांच्या संमोहनात अडकतात. ही लोक बऱ्याचदा श्रीमंत कुटुंबात जन्माला येतात. त्यांचे संगोपन राजपुत्राप्रमाणे केले जाते. त्यांना अफाट संपत्तीचा वारसा लाभला आहे. ही लोकं कोणताही व्यवसाय करत नसले, तरी त्यांना पैशांची कधीच कमतरता भासत नाही.
सर्व क्षेत्रात होतात यशस्वी
मूलांक 6 असलेले लोकं सर्जनशील प्रतिभेने समृद्ध असतात. बऱ्याचदा केवळ कला, संगीत किंवा साहित्य यासारख्या क्षेत्रांमध्ये रस घेत नाहीत. तर व्यावसायिकरित्या बरेच पैसे आणि प्रसिद्धी देखील कमवतात. आकर्षणाचे केंद्र बनण्याचा ही त्यांना छंद आहे. हा शुक्र प्रभाव मानला जातो, जो सर्व ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी आहे. पण कोणताही जातक हा केवळ गुणांचा खजिना नसतो. काही उणिवाही असतात. या मूलांकाचे लोकं अनेकदा जिद्दीही असतात असे निदर्शनास आले आहे. त्यांच्यात लवचिकता आणि अनुकूलता फारच कमी असते.