Shadashtak Yog:- भारतीय परंपरेमध्ये ज्योतिषशास्त्राला अतिशय महत्त्व असून अनेक ग्रहताऱ्यांचा व्यक्तींच्या जीवनावर पडणारा प्रभाव ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून अभ्यासला जातो किंवा त्याची माहिती आपल्याला होत असते. आपल्याला माहित आहे की अनेक ग्रहांचे गोचर म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो व त्या दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शनी हा सर्वात शक्तिशाली आणि न्यायाची देवता म्हणून समाजमनात प्रसिद्ध आहे.
त्यासोबतच मंगळाला देखील एक शक्तिशाली ग्रह म्हणून ओळखले जाते. सध्या शनीची स्थिती जर बघितली तर मीन राशीत वक्री आहे व नोव्हेंबरपर्यंत तो वक्री राहणार आहे. या कालावधी दरम्यान मंगळ अशा वेगळ्या स्थितीमध्ये येत आहे की त्यामुळे शनी आणि मंगळ एकत्रितपणे एक योग निर्माण करणार आहेत. साधारणपणे 13 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे व त्याच्या एक आठवड्यानंतर शनि आणि मंगळामुळे षडाष्टक योग निर्माण होणार आहे. षडाष्टक योग हा तसा अशुभ मानला जातो. परंतु तरीदेखील हा योग मात्र तीन राशींसाठी खूपचला शुभ राहणार आहे. चला तर मग या लेखात आपण त्या तीन राशी कोणत्या आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत.

या राशींवर होईल पैशांचा वर्षाव
1- मेष- शनि आणि मंगळामुळे तयार होणाऱ्या षडाष्टक योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. या योगामुळे या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये चांगला फायदा मिळू शकणार आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात संपत्ती वाढण्यास मदत होईल व नशीब देखील बाजूने असणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हा योगा अतिशय फायद्याचा असून करिअरमध्ये यामुळे प्रगती होणार आहे. तसेच या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये देखील आनंद पाहायला मिळेल व जुन्या काही मोठ्या समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे.
2- मिथुन- षडाष्टक योगाचा फायदा हा मिथुन राशीला देखील होणार असून या राशींच्या व्यक्तीसाठी हा योग शुभ असणार आहे. व्यवसायामध्ये नवीन यश मिळू शकणार आहे व मोठा नफा देखील मिळणार आहे. तसेच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या नवीन ऑर्डर मिळतील तसेच आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. षडाष्टक योगाच्या प्रभावामुळे या व्यक्तीचा खर्च कमी होण्यास मदत होणार असून पैसे देखील वाचू शकणार आहेत. तसेच या व्यक्तींना जर काही नवीन काम सुरू करायचे असेल तर या कालावधीत ते सुरू करू शकतात.
3- मीन- शनि आणि मंगळामुळे तयार होणारा षडाष्टक योग मीन राशीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळतील व व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. या व्यक्तींचा जर काही व्यवसाय असेल व त्यामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या देखील दूर होणार असून वडिलोपार्जित मालमत्तेतून खूप मोठा फायदा या व्यक्तींना होऊ शकणार आहे.