Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह एका कालावधीनंतर राशी बदलत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे योग आणि राजयोग तयार होतात. ग्रहांच्या चालीमुळे तयार झालेल्या योगामुळे अनेक राशींना त्याचा चांगला फायदा होतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल देखील घडतात. त्यांना कशाचीच कमतरता भासत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार रुचक पंच महापुरुष योग मंगळ ग्रहामुळे तयार होत असून ज्यावेळी मंगळ कुंडलीच्या केंद्रस्थानी मकर राशीत किंवा मूळ त्रिकोण राशीत मेष किंवा वृश्चिक राशीत असतो त्यावेळी राजयोग निर्माण होतो. असे झाल्याने धैर्य, संपत्ती आणि कीर्ती वाढते, व्यक्ती अधिक सामर्थ्यवान बनते.ज्यावेळी मंगळ मेष, वृश्चिक किंवा मकर राशीमध्ये स्थित असतो त्यावेळी त्याची शक्ती आणि सकारात्मक प्रभाव वाढतो.
या आहेत राशी
तूळ रास : मंगळाचे संक्रमण आणि रंजक महापुरुष राजयोगाची निर्मिती या राशीसाठी चांगले आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारून संसाधने वाढत जातील. पद आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल.
मकर रास : रंजक महापुरुषांचे राजयोग मकर रास असणाऱ्या लोकांसाठी अनुकूल ठरतील. उत्पन्न वाढल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळतील. करिअरमधील नवीन संधी आणि एखाद्याला दिलेला पैसा माघारी मिळेल. आयात-निर्यातीत गुंतलेल्या व्यावसायिकांना याचा चांगला आर्थिक नफा मिळेल.
सिंह रास : हा राजयोग सिंह रास असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेतला जाईल. तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगल्या ऑफर्स मिळतील. भौतिक सुख मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल.
वृश्चिक रास : मंगळ स्वतःच्या राशीत प्रवेश करत असल्याने राजयोगाची निर्मिती या राशीसाठी फायदेशीर ठरेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल.तुमच्या जोडीदाराशी संबंध सुधारू शकतात. तुम्हाला संपत्तीचा लाभ मिळेल. कामात यश मिळून आदर आणि धैर्य वाढेल.