Grah Gochar : 22 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. अन 19 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या काळात दोन मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलतील. 31 जुलै रोजी, राक्षसांचा स्वामी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि 25 ऑगस्टपर्यंत येथे राहील. दुसरीकडे ग्रहांचा राजा सूर्य 16 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. आणि 16 सप्टेंबरपर्यंत येथेच बसून राहणार आहे. या काळात शुक्र आणि सूर्याचा संयोगही तयार होईल. जो तीन राशींसाठी खूप शुभ मानला जात आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप खास मानला जात आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे धन आणि संपत्ती वाढवेल. कौटुंबिक जीवनही आनंदी राहील. परदेश प्रवासाचे योग येतील. रवि गोचरामुळे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना सूर्य आणि शुक्र या दोन्ही ग्रहांच्या भ्रमणाचा फायदा होणार आहे. या काळात मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनाही सूर्य आणि शुक्राच्या भ्रमणाचा फायदा होणार आहे. परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होईल. परदेशी कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. यश मिळण्याची दाट शक्यता असेल. आर्थिक बाजूही मजबूत असेल. तुमच्या आयुष्यात काही खास व्यक्ती येऊ शकतात.