कितीही पैसा कमावला तरी ‘या’ 5 चुकांमुळे घरात पैसा टिकणार नाही ! वास्तुशास्त्राचे हे नियम नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर….

Tejas B Shelar
Published:
Vastushastra Secrets

Vastushastra Secrets : सर्वजण आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करतात. आपल्या कुटुंबाला एक चांगले आयुष्य मिळावे, घरात सुख समाधान राहावे, आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे कमवतो.

पैसे कमावण्यासाठी आपण सर्वजण जीवाचे रान करतो. मात्र अनेकांच्या तोंडून कितीही पैसा कमावला तरी घरात पैसा टिकत नाही अशी तक्रार आपण ऐकली असेल.

अनेकांच्या तोंडून जेवढा पैसा कमावला जातो तेवढाच पैसा खर्च होतो अशी तक्रार केली जाते. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र कमावलेला पैसा टिकत नाही यामागे सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख कारण म्हणजे वास्तुशास्त्राचे नियम न पाळणे.

वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम जर पाळले गेले नाहीत तर कितीही पैसा कमावला तरी घरात पैसा टिकत नाही असे म्हणतात. यामुळे आज आपण वास्तुशास्त्राच्या याच नियमांची माहिती पाहणार आहोत. वास्तुशास्त्रात सांगितलेले कोणते असे नियम आहेत ज्यामुळे घरात पैसे टिकत नाहीत या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.

स्वयंपाक घर : वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर स्वयंपाक घर चुकीच्या दिशेला असेल तर घरात पैसा टिकू शकत नाही. कितीही कष्ट केलेत, कितीही पैसा कमावला तरी चुकीच्या दिशेने असणाऱ्या स्वयंपाक घरामुळे तो पैसा हातातुन निघून जातो. स्वयंपाक घर जर चुकीच्या दिशेने असेल तर घरात नेहमी दरिद्रता राहते. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाक घर म्हणजेच किचन नेहमी आग्नेय दिशेला म्हणजे पूर्ण आणि दक्षिण दिशेच्या मध्ये असायला हवं. किचन चुकूनही पश्चिम दिशेला ठेवू नये. जर तुमच्या घरात पश्चिम दिशेला किचन असेल तर घरात दरिद्रता येते, पैसा अधिक खर्च होतो.

तुटलेला पलंग : वास्तुशास्त्रानुसार घरात चुकूनही तुटलेला पलंग ठेवू नये. घरात जर तुटलेला पलंग असेल तर अशा घरात माता लक्ष्मी निवास करत नाही. तुटलेला पलंगच्या घरात असतो तिथे नेहमीच पैशांची तंगी असते. तुटलेल्या पलंगामुळे पैशांवर थेट परिणाम होतो. यामुळे खर्चात वाढ होत असते, परिणामी घरात पैसा दिसत नाही.

तिजोरी : घरात तिजोरीची दिशा सुद्धा पैशांवर परिणाम करत असते. तिजोरीचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असेल अशा प्रकारे तिजोरी ठेवली गेली पाहिजे. तिजोरीचं तोंड जर उत्तरकडे असेल तर माता लक्ष्मीची अशा कुटुंबावर विशेष कृपा असते. मात्र जर तिजोरीचे तोंड चुकीच्या दिशेला असेल तर माता लक्ष्मी कोपते.

कचराकुंडी : घरात कचराकुंडी कोणत्या दिशेला आहे त्याचाही धनावर परिणाम होत असतो. घराच्या उत्तप पूर्व अर्थात ईशान्य दिशेला कचराकुंडी ठेवू नये. या दिशेला कचरा मुळीच टाकू नये. जर तुम्ही या दिशेला कचरा कुठे ठेवत असाल तर तुमच्या घरात पैशांची तंगी राहण्याची शक्यता आहे. असे केल्याने माता लक्ष्मी कोपते आणि यामुळे पैसा टिकत नाही. म्हणून कचराकुंडी या दिशेला नसावी.

नळा मधून पाणी पडणे : जर तुमच्या घरात असणाऱ्या नळांमधून सातत्याने पाणी टपकत असेल तर हे अशुभ आहे. नळामधून सातत्याने पाणी जर टक्कत असेल तर अशा घरात पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे जर तुमच्याही घरात नळांमधून पाणी पडत असेल तर तुम्ही आधी तो नळ दुरुस्त करून घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe