Venus Transit | शुक्र ग्रहाला भारतीय ज्योतिषशास्त्रात “राक्षसांचा गुरु” म्हटले जाते, पण तो जीवनातील सुख, सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रेम यांचा कारकही आहे. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह बळकट असतो, त्यांना श्रीमंती, यश, आणि भाग्य लाभते. पण जेव्हा शुक्र दुर्बल किंवा प्रतिकूल स्थानावर असतो, तेव्हा आर्थिक संकट, आरोग्याच्या तक्रारी, आणि तणाव वाढू शकतो.
यावर्षी 31 मे 2025 रोजी शुक्र ग्रह मंगळाच्या घरात म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. या गोचराचा सर्व राशींवर काही ना काही परिणाम होणार असला तरी, वृषभ, वृश्चिक आणि कन्या राशींना विशेषतः सावध राहावे लागेल. त्यांच्या जीवनात अशांतता, नुकसान आणि संघर्षांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या तीन राशींसाठी कसा असेल हा काळ.

वृषभ (Taurus)
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असून, त्याच्या संक्रमणामुळे यावेळी वृषभ राशीच्या लोकांना शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोळ्यांशी संबंधित समस्या, त्वचाविकार, आणि मानसिक तणाव वाढू शकतो. कोर्ट-कचेऱ्यांशी संबंधित कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि मोठे निर्णय पुढे ढकला.
वृश्चिक (Scorpio)
या राशीतील लोकांना शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. कार्यालयात विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. या काळात तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या, हॉस्पिटलच्या भेटी संभवतात. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, आणि तरीही अपेक्षित निकाल मिळणे कठीण आहे.
कन्या (Virgo)
शुक्रचा गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी संघर्ष घेऊन येईल. कोर्ट प्रकरणांमध्ये गुंतण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून फसवणुकीचा धोका आहे, त्यामुळे कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. व्यवसायात नुकसान, संपत्ती व्यवहारांमध्ये अडथळे संभवतात. कोणालाही उधार देण्याचे टाळा. यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील.