Guru Purnima 2024 : भारतीय संस्कृतीत गुरूला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. गुरूशिवाय अज्ञानाचा अंधार दूर करणे अशक्य मानले जाते. हिंदू धर्मात दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि व्रत हे शुभ मानले जातात. या दिवशी लोक गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आदर केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात, असे मानले जाते. या दिवशी गुरु मंत्र पठण करण्याचीही परंपरा आहे. पंचांगानुसार या वर्षी गुरुपौर्णिमा आज २१ जुलै रोजी साजरी जात आहे. आजच्या या लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
पंचांगनुसार, या वर्षी गुरु पौर्णिमा 20 जुलै रोजी संध्याकाळी 05:59 वाजल्या पासून सुरु झाली आणि 21 जुलै रोजी दुपारी 03:46 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीप्रमाणे 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
गुरुपौर्णिमा का विशेष आहे?
सनातन धर्मात, वेदांचे लेखक, वेदव्यास जी यांची जयंती, गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेदव्यास हे जगातील पहिले गुरु मानले जातात. शास्त्रानुसार महर्षि वेदव्यास हे भगवान विष्णूचे रूप आहेत.
वेदांमध्ये गुरूचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे केले आहे. गुरूंसोबतच आई-वडिलांनाही गुरू समान मानून त्यांच्याकडून शिकून त्यांचा आदर केला पाहिजे. असे मानले जाते की गुरूंच्या आशीर्वादाने जीवन आनंदी आणि यशस्वी होऊ शकते. गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्याने आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हा विशेष सण गुरूंचा आदर व्यक्त करण्यासाठी आहे.