दरवाज्यात लिंबू-मिरची का लटकवतात? लक्ष्मीच्या बहिणीचा लोक तिरस्कार का करतात? तुम्हालाही लागेल शाँक

Published on -

धनाची देवी कोण? तर माँ लक्ष्मी. याच लक्ष्मीची सर्वजण पुजा करतात. तिला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. ज्या घरात देवी लक्ष्मी वास करते, तिथे कधीही धन, धान्य आणि आरोग्याची कमतरता भासत नाही. पण याच लक्ष्मीच्या बहिणीचा मात्र सर्वजन तिरस्कार करतात. जशी लक्ष्मी घरात येण्यासाठी विविध उपाय केले जातात तशीच लक्ष्मीची बहिण घरात येऊ नये म्हणूनही उपाय केले जातात. नेमके काय आहे कारण? हेच आपण पाहूयात…

कोण आहे लक्ष्मीची बहिण?

विविध वेदांमध्ये व भागवत पुराणात सांगितल्याप्रमाणे देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे. अलक्ष्मी ही गरिबी, कलह, आळस आणि अशुभतेचे प्रतीक मानली जाते. लक्ष्मी जिथे जाते तिथे समृद्धी, आनंद आणि संपत्ती असते. त्याऊलट अलक्ष्मी विरुद्ध गुण घेऊन येते. लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते, तर अलक्ष्मीला गरिबीची देवी म्हटले जाते. म्हणूनच लोक देवी लक्ष्मीला त्यांच्या घरात प्रवेश करू देत नाहीत आणि त्यासाठी विविध उपाय करतात.

दारावर लिंबू-मिरच्या बांधतात

अलक्ष्मी घरात प्रवेश करते तेव्हा आर्थिक संकट, घरगुती कलह आणि दुर्दैव येते, असे मानले जाते. अलक्ष्मी ही गरिबीचे प्रतीक मानली जाते. अलक्ष्मी जेव्हा घरात येते तेव्हा देवी लक्ष्मी घरातून निधून जाते. लक्ष्मीच्या प्रस्थानाचे ते लक्षण मानले जाते. म्हणून, त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी, लोक दारावर लिंबू आणि मिरच्या लटकवतात. अलक्ष्मीला लिंबू आणि मिरची अजिबात आवडत नाही. दाराशी जिथे तिला काहीतरी आंबट आणि तिखट म्हणजे लिंबू आणि मिरची दिसते, तिथून ती परत जाते. याशिवाय लिंबू-मिरची वाईट नजर, वाईट शक्ती आणि रोगांपासून संरक्षण करते, म्हणून दारात ती लटकवतात.

अलक्ष्मीची कथा काय आहे?

जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा अलक्ष्मी देवी लक्ष्मीसमोर प्रकट झाली. त्याच्या हातात दारू होती. तिचे स्वरूप घाणेरडे होते. म्हणूनच तिचे नाव अलक्ष्मी पडले. असे म्हटले जाते की अलक्ष्मी फक्त तिथेच राहते जिथे अस्वच्छता, दुःख आणि घाण असते. म्हणून, ते अशुभ मानले जातात. या दोन्ही बहिणी एकाच ठिकाणी राहत नाहीत, अशीही एक कथा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News