Zodiac Sign : आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस खास असतो. प्रत्येक दिवस आपल्याला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो तर दर दिवशी आपल्याला काहीतरी आनंदाची बातमी सुद्धा मिळत असते. दररोज आपल्या आयुष्याचे एक नवीन पान ओपन होते.
खरे तर आपल्या जीवनावर ग्रहांचा मोठा प्रभाव असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या चाली आपल्या जीवनात काय घडणार याचे संकेत देतात.

दरम्यान आता ऑक्टोबर महिना हा काही राशीच्या लोकांसाठी मोठा लकी राहणार आहे. खरेतर शुक्र ग्रह धन, वैभव, भौतिक सुखसोयी आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो.
त्यामुळे शुक्र ग्रहाचे प्रत्येक गोचर जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडते. आता येत्या 9 ऑक्टोबरला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
कन्या राशी : शुक्र ग्रह तुमच्या लग्नस्थानात प्रवेश करत असल्याने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहील. आत्मविश्वास आणि ऊर्जेत वाढ होईल. पूर्वी आखलेल्या योजना यशस्वी होतील.
कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विवाहितांच्या नात्यात गोडवा वाढेल, तर अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेले कामही यशस्वी ठरेल.
वृश्चिक राशी : शुक्राचा हा गोचर तुमच्या अकराव्या भावात होत असल्याने उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल.
शेअर बाजार, सट्टेबाजी किंवा लॉटरीत नशीब आजमावण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि मुलांबाबतही आनंदाची बातमी मिळू शकते.
धनु राशी : करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. नवीन नोकरी किंवा करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
विशेषतः कला, माध्यम, संगीत, फॅशन आणि लक्झरी क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रगतीची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वडील किंवा गुरुजनांसोबतचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण राहतील.