Zodiac Sign : ऑक्टोबर महिना आता समाप्तेकडे वाटचाल करत आहे. दोन दिवसात ऑक्टोबर महिन्याची सांगता होईल आणि नव्या नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान पुढील नोव्हेंबर महिना हा काही राशीच्या लोकांसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
आतापर्यंतचा संकटाचा आणि आव्हानाचा काळ संपूर्ण नवीन स्वर्ण काळाला सुरुवात होणार आहे. खरे तर शुक्र ग्रह पुढल्या महिन्यात राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली की शुक्र ग्रह तुळ राशीत विराजमान होईल आणि त्यानंतर 7 नोव्हेंबरला शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार अशी माहिती ज्योतिष तज्ञांकडून देण्यात आली आहे.

याचाच प्रभाव म्हणून राशीच्या घरातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे. दरम्यान आता आपण शुक्र ग्रहाच्या या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा नेमका कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार? या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर नोव्हेंबरच्या सुरुवातीला शुक्र ग्रह तुळ राशीमध्ये विराजमान होईल आणि यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. यानंतर शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल ज्यामुळे राशीचक्रातील तीन महत्त्वपूर्ण राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे.
मेष – ह्या राशीच्या लोकांना लवकरच मोठा बदल पाहायला मिळेल. आतापर्यंत सुरू असणारी संकटांची मालिका आता दूर होईल आणि नशिबाची साथ लाभणार आहे. शुक्राच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव म्हणून या लोकांना करिअरमध्ये बढती, नवीन जबाबदाऱ्या किंवा आकर्षक ऑफर मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट आणि चांगले क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. हा काळ या लोकांसाठी फारच अनुकूल राहणार आहे. जे लोक विदेशात काम करण्याचे स्वप्न पाहतायेत त्यांना सुद्धा शुभ संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि सामाजिक संपर्कांमुळे लाभ होणार आहे.
मिथुन – ह्या राशीसाठी पण शुक्राचा तूळ राशीतील प्रवेश अत्यंत लाभदायक ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शुक्राच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तन यामुळे या लोकांना धनवृद्धी आणि सर्जनशील यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे.
नोकरदार मंडळी प्रमाणेच व्यवसायिकांना पण गुंतवणूक आणि शेअर मार्केटमधून नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजनांमध्ये प्रगती होईल आणि जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक सुसंवादी होतील.
सिंह – या राशीसाठी सुद्धा हा काळ गेम चेंजर ठरू शकतो. करिअर आणि वैयक्तिक जीवनात मोठी उपलब्धी साध्य होण्याची शक्यता आहे. शुक्र ग्रहाच्या राशी तसेच नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना नोकरीत बदल, शहरांतर किंवा विदेशात मोठी संधी निर्माण होऊ शकते.
या लोकांनी प्रामाणिक कार्य केले तर त्यांच्या कामगिरीची दखल घेतली जाईल. तसेच जे लोक नोकरी करतायेत त्यांना पगारवाढीची भेट मिळणार आहे. जे लोक बिजनेस मध्ये सक्रिय आहेत त्यांना या काळात चांगला नफा मिळणार आहे.
त्याचवेळी वैवाहिक जीवन देखील अधिक मधुर होईल. नात्यांमधील जुने मतभेद काळाच्या ओघात मिटत जातील. खऱ्या अर्थाने वाईट काळ संपून नवीन स्वर्ण काळाला सुरुवात होणार आहे.













