Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आता लवकरच काही लोकांचा गोल्डन टाईम सुरु होणार आहे. हा महिना काही लोकांसाठी खास राहणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मफळ दाता शनीदेव काही लोकांवर आपली विशेष कृपादृष्टी दाखवणार आहे.
ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यात शनीदेव वक्री झाले होते. पण आता शनी मार्गी होणार आहे. तब्बल 138 दिवसांच्या वक्री अवस्थेनंतर येत्या 28 नोव्हेंबर रोजी शनी ग्रह मीन राशीत मार्गी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान शनि देवाच्या या चालीमुळे काही राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. खरे तर या घटनेचा सर्वच राशींवर प्रभाव पडणार आहे. पण ही घटना काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. यामुळे विपरीत राजयोग तयार होईल आणि या घटनेचा तीन महत्त्वाच्या राशींवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे.
मीन, सिंह आणि धनु या 3 राशीच्या जातकांवर येत्या काळात शनि देवाची विशेष कृपा राहणार आहे. दरम्यान आता आपण या तीन राशीच्या लोकांना शनि देवामुळे कोणकोणते लाभ मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
मीन – या राशीच्या जातकांचा शुभ काळ सुरु होणार आहे. या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती साधता येणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सुद्धा चांगले यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फायद्याचा राहणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे सुद्धा या काळात पूर्ण होणार आहे.
या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे अन उत्पन्नात पण वाढ होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ या लोकांसाठी लाभाचा राहणार आहे. या लोकांना गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळणार आहे. मालमत्तेतून तसेच वाहनांमधून चांगला फायदा मिळणार आहे.
सिंह – या राशीचा वाईट काळ देखील लवकरच संपणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन आणि पगारवाढीसारखी भेट मिळू शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांना चांगला सन्मान मिळणार आहे. वैवाहिक जीवन सुद्धा अधिक मधुर होणार आहे.
या लोकांच्या आयुष्यातील अडचणी सुद्धा आता दूर होणार आहेत. संततीप्राप्तीचेही संकेत आहेत. मानसिक ताण कमी होईल. समाजात सुद्धा मान-सन्मान वाढणार आहे. बिजनेस मध्ये पण चांगला लाभ मिळणार आहे.
धनु – या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल असे संकेत मिळत आहेत. नवीन घर-वाहन खरेदीचे योग आहेत. कामात चांगली प्रगती होणार आहे. विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या लोकांचा वाईट काळ आता दूर होणार आहे.