फक्त दिवाळीपर्यंत थांबा ! ‘या’ राशीच्या लोकांचा वाईट काळ संपणार, पैशांच्या अडचणी कायमच्या संपणार  

Published on -

Zodiac Sign : येत्या काही दिवसांनी देशात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान यंदाची दिवाळी ही अनेकांसाठी फायद्याची ठरेल. दिवाळीनंतर काही लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. सूर्य व चंद्र ग्रहांची दिवाळीनंतर युती होणार आहे. यामुळे राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांचा वाईट काळ समाप्त होईल व नव्या सुवर्णकाळाला सुरुवात होणार आहे.

दिवाळीच्या आधी सूर्य ग्रह राशी बदल करणार आहे. 17 ऑक्टोबरला दुपारी सूर्याचे तुळ राशीत संक्रमण होणार आहे. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एक मोठा बदल होईल. 21 ऑक्टोबरला चंद्राचे सुद्धा याच राशीत संक्रमण होणार आहे.

म्हणजे तूळ राशीत सूर्य व चंद्रग्रह एकत्र येतील. दरम्यान आता आपण चंद्र व सूर्यग्रहाच्या युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. 

तूळ – नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मनातील भीती काही प्रमाणात कमी होईल. आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी या काळात दूर होतील.

बिजनेस मध्ये देखील अनपेक्षित रित्या मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या लोकांची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहणार आहे. शिक्षण उद्योग नोकरी अशा सर्वच ठिकाणी या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.

सिंह – दिवाळीत या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जवळचे लोक यांना विशेष सहकार्य करतील. एखाद्या मित्राकडून या लोकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या हा काळ फायद्याचा ठरणार आहे. घरातील वडीलधाडील लोकांच्या आशीर्वादामुळे आपापल्या क्षेत्रात या लोकांना चांगले यश मिळणार आहे.

कर्क – ऑक्टोबर महिना या लोकांसाठी खास ठरेल. मानसिक ताण कमी होईल. हे लोक आपल्या विरोधकांवर विजय मिळवतील. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग तयार होत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. हे लोक आपल्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवणार आहेत. या लोकांचे वैवाहिक आयुष्य अधिक मधुर होणार आहे. या लोकांचा संसार सर्वांना हेवा वाटावा असा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News